धुळे शहर
महानगरपालिकेच्या प्रभाग रचना आणि वॉर्ड रचना पारदर्शकपणे करावी तसेच कोणाच्या दबावाखाली करू नये अशी मागणी रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळाने धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त सौ अमिता दगडे पाटील आणि अतिरिक्त आयुक्त डहाळे मॅडम यांच्याकडे केली.
नुकतेच महाराष्ट्र शासन, निवडणूक आयोग, नगर रचना विभाग यांनी शासन निर्णय काढून धुळे महानगरपालिकेच्या वॉर्ड रचना, प्रभाग रचना संदर्भात आदेशित केले आहे. त्यानुसार नवीन प्रभाग रचना सुधारणा करण्यात येत आहे.सदर प्रभाग रचना, वॉर्ड रचना ही पारदर्शकपणे करावी. कोणाच्याही दबावाखाली करू नये. तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार सदर प्रभाग रचना करावी. सर्वांना विश्वासात घ्यावे. धुळ्यात शासनाच्या मार्गदर्शक सूचना व नियमांना डावलून प्रभाग रचना करण्यात येत आहे, अशा तक्रारी आहेत. लोकशाहीमध्ये नियमांना डावलून अन्यायकारक प्रभाग रचना करणे घातक ठरू शकते. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाप्रमाणेच प्रभाग रचना, वॉर्ड रचना करावी. कोणाच्याही दबावाला बळी पडू नये. बाहेरील लोकांच्या हस्तक्षेप होऊ नये. प्रभाग रचना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्त सूचना देण्यात याव्या.अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने करण्यात आले.
यावेळेस रणजीत राजे भोसले, जोसेफ अण्णा मलबारी,भीका नेरकर, नंदू येलमामे, संजय माळी,राजू डोमाळे, अशोक धुळकर, रामेश्वर साबरे, तावडे सर, डी.जे मराठे, दीपक देवरे, भानुदास वाघ, बरकत शहा, अमित शेख,भटू पाटील, मनोहर निकम, मंगल वाघ, राजू मशाल, विश्वजीत देसले,शेख हूजेर, अशोक गवळे, कृष्णा ठाकरे, राजेंद्र सोनवणे, ईश्वर जाधव, विकी ढीवरे, कल्पेश मगर, युनुस शेख, राजू चौधरी, भूषण पाटील, आधी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.