धुळे शहर
धुळे शहरातील साक्री रोडवरील आयकर भवन ते पत्रकार भवन, नर्सेस कॉर्टर या दरम्यान महिला व पुरुष प्रवाशांसाठी स्वच्छतागृहाची सोय करावी अशी मागणी शिवसेना (उबाठा) महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी केली आहे.
या ठिकाणी रात्री नऊ नंतर सुरतकडे जाणार्या ट्रॅव्हल्स थांबत असतात,सायंकाळी सात वाजेनंतर सुरत कडुन येणार्या ट्रॅव्हल्स याच ठिकाणी प्रवाशांना उतरवितात, रात्री नऊ नंतर या ठिकाणी प्रवाशांची प्रचंड गर्दी होते.यावेळी आपल्या महिला भगिनींना या रस्त्यावर प्रसाधनगृहाची व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या कडेलाच आपला विधी घाबरलेल्या अवस्थेत पार पडावा लागत असे,कारण या रस्त्यावर दत्त मंदिरा कडे जाणारी वर्दळ रात्री दहापर्यंत सुरू असते,आयकर भवन, विक्रीकर भवन, जिमखाना,पोलीस प्रशिक्षण केंद्र न्यायाधीश यांची निवासस्थाने,सरकारी धान्य गोदाम, मुख्य वनसंरक्षक यांची निवासस्थाने व महत्त्वाची रुग्णालय येतात,त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने रात्री उशिरापर्यंत वर्दळ सुरू असते, प्रसाधना साठी जाणार्या महिला भगिनींसाठी हा प्रकार अत्यंत नकोसा असा झालेला होता,कारण या ठिकाणी उघड्यावर जाण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती, नर्सेस कॉटरला लागून असलेल्या मोकळ्या जागेत महानगरपालिकेने डम्पिंग ग्राउंड बनविल्यामुळे या ठिकाणी मातीचे ढिगारे काटेरी झाडे प्रचंड प्रमाणात वाढलेली होती,तसेच ज्या ठिकाणी प्रचंड कचर्याचे साम्राज्य निर्माण झालेले होते.
शिवसेना महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी सातत्याने महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क साधून या भागातील स्वच्छता निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून आज जेसीबीने या संपूर्ण भागाची साफसफाई करून घेतली, तसेच या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीच्या डीपी भोवती असलेली काटेरी झाडे देखील शहर अभियंता यांना संपर्क साधून अर्ध्या तासाकरता वीज पुरवठा खंडित करून काढून घेतली,यामुळे आता या ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रवास करणार्या महिलांना प्रसाधनगृहाची व्यवस्था करता येऊ शकेल.
या ठिकाणी प्रसाधनगृह महानगरपालिकेवतीने बसविण्यात यावे अशी मागणी धीरज पाटील यांनी केली असून महानगरपालिकेला शक्य न झाल्यास सामाजिक बांधिलकीतून येथे प्रसाधनगृह उभारण्यासाठी अनेक समाजसेवींनी तत्परता दाखवली आहे.पत्रकार भवन ते दत्त मंदिर पर्यंतचा रस्ता देखील दोन्ही बाजूने लवकरच साफ करण्यात येणार आहे, सदरचं काम अत्यंत छोटं असं होतं पण या कामासाठी गेल्या पंधरा दिवसापासून मनपाचे जेसीबी उपलब्ध होत नव्हते आणि स्वच्छता करणार्या कामगारांकडून हे काम करता येणे शक्य नव्हते त्यामुळे दररोजच पाठपुरावा करणे गरजेचे झाले,सततच्या पाठपुराव्यामुळे आज महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील, राजेश वसावे, किशोर मोरे रवी धुमाळ यांनी हे काम मार्गी लावले. फक्त आंदोलनात्मक दृष्टिकोनातून जनतेच्या समस्या न मांडता, संबंधित समस्येचा योग्य तो पाठपुरावा केल्याने समस्या सुटू शकते हे शिवसेना महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी दाखवून दिले असून अकार्यक्षम महानगरपालिकेला कार्यक्षम कसे बनवायचे याचा परिपाठ त्यांनी घालून दिल्याबद्दल या परिसरातील अनेक नागरिकांनी त्यांच्या अभिनंदन केले आहे.