वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फुलहार, फुलगुच्छ अथवा श्रीफळ शाल ऐवजी न वापलेली 1 साडी आणावी – अरुण धोबी

धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांचा 5 सप्टेंबर रोजी वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर आवाहन

शिरपुर :

धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस, परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश संघटक तथा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ जिल्हा उपाध्यक्ष अरुण धोबी यांचा 5 सप्टेंबर  रोजी 52 वाढदिवस आहे.

सालाबाद प्रमाणे यंदाही वाढदिवसाला फुलहार, फुलगुच्छ अथवा श्रीफळ शाल आणु नाही. *त्याऐवजी न वापलेली 1 साडी आणावी* असे आवाहान करण्यात आले आहे. जमलेल्या सर्व साड्या ह्या गरजु महिलांना वाटप करण्यात येणार आहेत.

तथापि, शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजे पासुन रात्री 8.00 वाजे पर्यंत शिरपुर शहरातील भाजपा कार्यालयात व श्री. संत गाडगे बाबा लाॅन्डी विजयस्तंभ जवळ शिरपुर येथे आपल्या शुभेच्छा व आशीर्वाद स्वीकारण्यासाठी अरुण धोबी हे उपस्थित राहणार आहेत. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा सदैव असल्याने कोणीही हार, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ वर खर्च करू नये. *त्याऐवजी न वापलेली 1 साडी आणावी* असे आवाहान करण्यात आले आहे. जमल्या सर्व साड्या ह्या गरजु महिलांना वाटप करण्यात येणार आहेत. असे कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *