धुळे शहर
धुळे महापालिकेचा महापौर कोण होणार, पुन्हा एकदा ५० नगरसेवक निवडून आलेल्या भाजपाकडून कोणाला महापौर बनवण्यात येणार या प्रश्नाची उत्तर अवलंबून असलेली महापौर पद आरक्षण सोडत अखेर आज मुंबई मंत्रालयात काढण्यात आली आहे.
या आरक्षण सोडतीत धुळे महापालिकेचे महापौर पद सर्वसाधरण खुले अर्थात ओपन कॅटगरीतील महिला नगरसेविकेसाठी निघाले आहे. त्यामुळे आता धुळे महापालिकेचा महापौर होण्यासाठी निवडून आलेल्या भाजपाच्या अनुभवी तसेच तरुण आणि आ.अनुप अग्रवाल यांच्या विश्वासातील नगरसेवकाच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडणार हे आता निश्चीत झाले आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष लागून असलेल्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत आज अखेर मंत्रालयात पार पडली. राज्यातील महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडले होते. तर १६ जानेवारीला निकाल जाहीर झाला होता. महापालिकेतील सत्तेचे समीकरण निश्चित करण्यासाठी या सोडतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष होते. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत आज ही आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली. या सोडतीमुळे अनेक महापालिकांमध्ये कोणत्या पक्षाचा महापौर बसणार याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
राज्यातील २९ महापौरपदांसाठी आरक्षण जाहीर झाले आहे. अनुसूचित जमातीसाठी १, अनुसूचित जातीसाठी ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसीसाठी ८, आणि सर्वसाधारण १७ प्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आलंय. आता महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांमध्ये मोठ्या घडामोडी बघायला मिळत आहेत.
धुळे, जळगाव महापालिकांच्याही आरक्षण सोडत जाहीर झाली असून अनेक दिग्गजांना धक्का बसला. अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिला महापौर असणार आहे. कोल्हापूर महापालिकेतही महापौर पद हे ओबीसीसाठी आरक्षित असणार आहे. इचलकरंजीमध्येही ओबीसी महापौर असेल. जळगाव महापालिकेचे महापौरपद महिला ओबीसीसाठी आरक्षित असणार आहे.
सोलापूर, पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, नाशिक, धुळे, मालेगाव या महापालिकांवर सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण सोडत निघाली. या पालिकांवर ओपन प्रवर्गातील महापौर असणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. दोन्ही महापालिकेवर भाजपाची सत्ता आहे. महापौर पदासाठी मोठी रस्सीखेच बघायला मिळत आहे.
आरक्षण सोडत दरम्यान राजकीय पक्ष आक्षेप घेताना दिसत आहेत. परभणी आणि मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतवर आक्षेप घेण्यात आला आहे. आरक्षण सोडतदरम्यान ठाकरे गटाकडून गोंधळ घातला गेला. आता राजकीय पक्षांकडून सत्तास्थापनेसाठी जोरदार तयारी केली जात आहे. आरक्षण स्पष्ट झाले असून पुणे महापालिकेचे महापौर सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असणार आहे. धुळ्यात देखील महिला खुल्या गटासाठी महापौर पद राखीव ठेवण्यात आलंय.
*महापौर पदाची आरक्षण*
*अनुसूचित जमाती साठी राखीव*
– कल्याण डोंबिवली
*अनुसचित जाती साठी राखीव महापालिका*
ठाणे (सर्वसाधारण )
जालना (महिला )
लातूर (महिला )
*नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला आरक्षण)*
– जळगाव
– चंद्रपूर
– अहिल्यानगर
– अकोला
*नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण )*
– पनवेल
– इचलकरंजी
– कोल्हापूर
– उल्हासनगर
*सर्वसाधारण महिला आरक्षण (9 पदे)*
– पुणे
– धुळे
– बृहन्मुंबई
– नवी मुंबई
– नांदेड वाघाळा
– मालेगाव
– मीरा भाईंदर
– नागपूर
– नाशिक
*सर्वसाधारण (खुला)*
– छ. संभाजी नगर
– परभणी
– सांगली मिरज कुपवाड
– अमरावती
– वसई विरार
– सोलापूर
– पिंपरी चिंचवड
– भिवंडी निजामपूर
–