धुळे महापालिका पुन्हा भाजपाच्या ताब्यात ! आ.अनुप अग्रवाल यांचे धुळ्यात निर्विवाद नेतृत्व सिद्ध!!

भाजपला ५० जागा, राष्ट्रवादीला ०८ तर शिंदे सेनेला ०५ जागा, एमआयएमला १० जागा 

धुळे शहर

भाजपाने एकहाती बहुमत मिळवत धुळे महापालिकेवर आपला झेंडा पुनःश्च फडकविला आहे. आमदार अनुप अग्रवाल यांनी आपले धुळ्यातील नेतृत्व निर्विवादपणे सिद्ध केले आहे.

भाजपाने ५० जागा मिळवल्या असून राष्ट्रवादीला ०८ तर शिंदे सेनेला ०५ जागा मिळाल्या आहेत. एमआयएमने १० जागांवर विजय मिळवला आहे. तर ०१ अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. दरम्यान, भाजपाने यापुर्वीच चार जागा बिनविरोध करुन आपले मनसुबे दाखवून दिले होते. हिच विजयी घोडदौड भाजपाने कायम राखण्यात यश मिळविले. या दिग्विजयी कामगिरीनंतर धुळ्यात भाजपेयींचा हायजोश बघायला मिळतोय. ठिकठिकाणी आतषबाजी आणि मनसोक्त गुलालाची उधळण सुरु झाली आहे.

धुळे महापालिकेच्या एकूण ७४ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात प्रभाग एक मधील १ जागा, प्रभाग सहामधील १ जागा आणि प्रभाग १७मधील ०२ जागा अशा एकूण भाजपाच्या चार जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित ७० जागांसाठी काल मतदान घेण्यात आले होते. त्यात एकूण ५६.७२ टक्के मतदान झाले होते. या ७० जागांसाठी एकूण ३१६ उमेदवार रिंगणात होते.  आज सकाळी बाजार समितीच्या आवारात असलेल्या वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये मुख्य निवडणूक निरीक्षक ओमप्रकाश पवार, निवडणूक निरीक्षक देवदत्त केकान तसेच आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत मतमोजणीची प्रक्रिया पार पडली.

प्रभागनिहाय विजयी उमेदवार…

प्रभाग १ – उज्ज्वला रणिजत भोसले (भाजप-बिनविरोध), योगीता संजय कुटे (भाजप), ललित गंगाधर माळी (भाजप), सुभाष सुकलाल जगताप (भाजप).

प्रभाग २- कविता शरद सोनवणे (भाजप), डॉ. निशा सुशिलकुमार महाजन (भाजप), प्रभावती विलास शिंदे (भाजप), सुनिल (नंदुभाऊ) वसंतराव सोनार (भाजप).

प्रभाग ३-शोभा संजय भिल (भाजप), मिनल आकाश परदेशी (भाजप), युवराज (सनी) लक्ष्मण चौधरी (भाजप), देवेंद्र चंद्रकांत सोनार (भाजप).

प्रभाग ४- शेख शहनाज बी गुलाम खाटीक (राष्ट्रवादी काँग्रेस), शेख तोहीम अनम (राष्ट्रवादी काँग्रेस), अन्सारी इरफान अहमद फजलू रहमान (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रवीण बानो शेख रफिक (राष्ट्रवादी काँग्रेस).

प्रभाग ५- नागसेन दामोदर बोरसे (भाजप), प्रतिभा शिवाजीराव चौधरी (भाजप), संध्या सागर कदम (भाजप), कृपेश लक्ष्मण नांद्रे (भाजप).

प्रभाग ६ – भगवान शंकर गवळी (भाजप), ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील (भाजप-बिनविरोध), वैभवी अमित दुसाणे (भाजप), कमलेश नारायण देवरे (भाजप).

प्रभाग ७ – वंदना संजय भामरे (भाजप), रंगनाथ रतन ठाकरे (भाजप), रुपाली जगदिश पाटील (भाजप), विजय अरुण देवरे (भाजप).

प्रभाग ८ – लताबाई हरिश्चंद्र अहिरे (शिवसेना), प्रियंका खंडू बोरसे (भाजप), उज्ज्वला अनिल ठाकरे (भाजप), निलेश चंद्रकांत नेमाणे (भाजप).

प्रभाग ९ – पुनम जितेंद्र शिरसाठ (भाजप), प्रदीप पुरनदास बैरागी (भाजप), लताबाई यशवंत सोनार (भाजप), संजय सुधाकर जाधव (भाजप).

प्रभाग १०-सुनिल तुळशीराम बैसाणे (भाजप), प्रतिभा अनिल पाटील (भाजप), किरण राकेश कुलेवार (भाजप), ललित विरभान आरुजा (भाजप).

प्रभाग ११- रोहित भानुदास चांदोडे (भाजप), मायादेवी महादेव परदेशी (भाजप), कल्पना सुनिल महाले (भाजप), चेतन संजय गवळी (भाजप).

प्रभाग १२- प्रतिक प्रदीप कर्पे (भाजप), जयश्री कमलाकर अहिरराव (भाजप), शितल राहुल वाघ (भाजप), विक्रम (छोटू) फकीरा थोरात (भाजप).

प्रभाग १३- शाहबाज शाह फारुक शाह (राष्ट्रवादी काँग्रेस), फातेमा बी नुरुलअमीन (राष्ट्रवादी काँग्रेस), शाह नजमा शफी (राष्ट्रवादी काँग्रेस), शेख मतीन अहमद लियाकत अहमद (राष्ट्रवादी काँग्रेस).

प्रभाग १४- मन्सुरी मुक्तार कासिम (एमआयएम), हसिना बानो साजीद अली अन्सारी साजीदभाई (एमआयएम), शेख शाहजहानबी वसीम मंत्री (एमआयएम), मिर्झा शोएब नवाब बेग (एमआयएम).

प्रभाग १५- अन्सारी अब्दुल लतिफ अब्दुल हमीद (एमआयएम), अन्सारी आमेराबानो सऊदुल हसन (एमआयएम), अन्सारी हालीमा बानो मोहम्मद शाबान (एमआयएम), युसूफ मुल्ला (एमआयएम).

प्रभाग १६- धीरज रामेश्वर परदेशी (भाजप), कल्याणी सतिष अंपळकर (भाजप), पुष्पा राजेश पवार (भाजप), दीपक (बंटीभाऊ) सुरेश खोपडे (शिवसेना)

प्रभाग १७- अमोल पावबा मासुळे (भाजप-बिनविरोध), सुरेखा चंद्रकांत उगले (भाजप-बिनविरोध), धिरज जवाहरलाल कलंत्री (शिवसेना), गिता तुषार नवले (शिवसेना).

प्रभाग १८- चित्रलेखा विकी परदेशी (भाजप), मंगला सुनिल सोनवणे (शिवसेना), सारिका प्रविण अग्रवाल (भाजप).

प्रभाग १९-मदिना समसेर पिंजारी (एमआयएम), रऊफ खान हुरमतखान पठाण (अपक्ष), आमिर असलम पठाण (एमआयएम).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *