दभाषी फाट्यावर एस.टी. बसला अपघात शाळकरी मुलीचा मृत्यू ; २२ जण जखमी

 

धुळे जिल्हा

धुळे जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील दभाषी फाट्यावर परिवहन महामंडळाच्या शिरपूर-शिंदखेडा बसला भरधाव ट्रकची धडक बसल्याने झालेल्या अपघातात एका ८ वर्षाच्या शाळकरी मुलीचा मृत्यू झाला असून बसचे चालक वाहकासह २२ प्रवासी जखमी झाले आहेत. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. नुपूर गणेश सोनवणे असे मयत मुलीचे नाव असून ती पाटण (ता. शिंदखेडा) येेथील रहिवाशी होती.


अपघातस्थळी मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार, शिंदखेडा आगाराची एमएच १४ बीटी २११२ या क्रमांकाची बस आज सकाळी शिरपूर कडून शिंदखेडा येथे जाण्यासाठी निघाली असतांना मुंबई-आग्रा महामार्गावरील दभाषी फाट्यावर पोहोचली आणि आरजे ११ जीसी ३४८७ या क्रमांकाची मालमोटार बसवर मधोमध आदळली. आज सकाळी साडेआठ वाजेला हा अपघात घडला. या अपघातात बसचे चालक शैलेंद्र परदेशी आणि वाहक राहुल सूर्यकांत विंचुरकर यांच्यासह बसमधील २३ पैकी २२ प्रवासी जखमी झाले आहेत. दभाशी गावाजवळील वळणावर बस वळण घेत असताना बस चालकाला समोरून भरधाव येणार्‍या मालमोटारीचा अंदाज घेता आला नाही यामुळे बस पुढे जाताच समोरून आलेली मालमोटार बसवर धडकली आणि हा अपघात झाला अशी माहिती मिळाली.

या अपघातात जखमी व्यक्ती या शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यातील आहेत. जखमींना शिरपूर ग्रामीण तसेच धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या अपघातातील जखमींची नावे अशी-

वर्षा दिनेश माळी,अश्विनी अमोल गायकवाड,रेखाबाई चुडामन माळी,सुरेश मन्साराम माळी,यमुनाबाई महारु वडार, चैताली चुडामन पाटील,अरुणाबाई संभाजी माळी,रतिलाल सुखा धनगर, नर्मदाबाई सुरेश माळी,सुशीला विकास बोरसे,बिलाल नवाब शेख,राहुल सूर्यकांत विंचुरकर,नाकीब ससलीम खाटीक, प्रफुल्ल शनिश्वर पवार,समीर शेख इस्माईल,प्रवीण गुलाब पाटील, जियाउद्दीन नवाबुद्दीन शेख,रोहिणी रघुनाथ महिरे, गोरख भालचंद्र पाटील, इंदुबाई सिताराम माळी,गंगुबाई आत्माराम माळी शैलेंद्र व प्रल्हादसिंह परदेशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *