धुळ्यात छत्रपती संभाजी महाराज स्मारकाला ग्रहण लावण्याचा शिवद्रोह्यांचा प्रयत्न ; स्मारक समितीचा मनपाला इशारा

धुळे शहर

छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या समोर उभारण्यात येत असलेले विर सावरकर स्मारकाचे काम त्वरीत थांबविण्यात यावे, अशी नागणी करीत छ. संभाजी राजे पुर्णा कृती पुतळा समितीच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. सदर कामामुळे छ. संभाजी महाराज यांच्या स्मारकास अडथळा निर्माण होऊन ते पूर्णपणे झाकले जाणार असल्याने स्मारकाला पुन्हा ग्रहण लावण्याचे पाप काही ठेकेदार व मनपातील काही भ्रष्ट अधिकारी व शिवद्रोही करीत आहेत, असा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, धुळे शहराच्या इतिहासात तसेच संपूर्ण खान्देश प्रथम तीस फुट उंचीचे छ. संभाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक धुळे मनपाच्या <span;>व स्मारक समितीच्या पुढाकारातून उभारण्यात आले आहे. परंतु काही महिन्यांपूर्वी वीर सावरकर यांचा पुतळ्याजवळ सुशोभिकरण काम सुरू करण्यात आले होते. त्यावेळी स्मारक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त मॅडम यांची भेट घेऊन सुशोभिकरण संदर्भात काही सूचना केल्या होत्या. त्यावेळी कामाला तुर्तास ब्रेक देण्यात आला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच पुन्हा सावरकर पुतळ्याच्या सुशोभिकरण कामास सुरूवात करण्यात आली असून, त्या सुशोभिकरणामुळे छ. संभाजी महाराजांचे स्मारक ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाकले जात आहे. त्यामुळे आमच्या मनपाला वेदना होत आहे. १२ वर्षांच्या संघर्षातून निर्माण झालेल्या छ. संभाजी महाराज स्मारकाला पुन्हा ग्रहण लावण्याचेपाप काही ठेकेदार, धुळे मनपातील काही भ्रष्ट <span;>अधिकारी, शिवद्रोही आर्कीटेक्ट तसेच काही राजकीय मंडळी करतांना दिसत आहे. छ. संभाजी महाराजांची ही विटंबना असून ती कदापी सहन केली जाणार नाही. तरी त्वरीत सावरकर पुतळ्याच्या सुशोभिकरणाचे काम त्वरीत थांबवावे, अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असा इशाराही निवेदनातून स्मारक समितीचे अध्यक्ष नानासाहेब कदम, सचिव अर्जुन पाटील, अॅड. दिनेश काळे, ऋषीकेश पाटील आदींनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *