नंदुरबारात खळबळ ;  मद्य व्यापाऱ्यावर आयकर विभागाचे छापे ! 

 नंदुरबारात मद्य व्यापाऱ्यावर आयकर विभागाचे छापे, 55 लाखाची केली वसुली !! 
 नंदूरबार : Nandurbar
राज्यभर महापालिका निवडणुकीची धामधूम सुरु असतांना नंदूरबार शहरात आयकर विभागाने मद्य विक्रेत्या व्यापाऱ्यांवर छापा (Income tax raid) टाकत 55 लाखाचा कर वसूल करण्यात आला, यामुळे मोठी खळबळ आली आहे
१२ जानेवारी २०२६ रोजी, नाशिक व जळगांव येथील आयकर टीडीएस पथकानी संयुक्त आयकर आयुक्त टी डी एस रेंज नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार येथील दारूचे व्यापार करणाऱ्या त्रिमूर्ती ट्रेडर्स व पूर्वी मार्केटिंग्सचे मालक सदानंद पृथ्वीराज झरवार यांच्या आस्थपनेच्या कार्यालयात सर्वे करून दिवसभर विविध कागदपत्रांची तपासणी केली.
आस्थापनेच्या चालू आर्थिक वर्षात 55 कोटी रुपयांची दारू विक्री झाली असतांना त्यावरील 1 टक्का कर टी डी एस 55 लाख रुपये शासकीय तिजोरीत जमा केलेला नव्हता या कारणास्तव आयकर विभागाच्या टीडीएस अधिकाऱ्यांनी आस्थापनेची सखोल चौकशी केली. तसेच तातडीने 55 लाख रुपये शासकीय तिजोरीत भरणा करून घेतले आणि मागील बांकी 50 लाख रुपये 15 दिवसात भरण्यासाठी व्यापाऱ्यांनी वेळ मागून घेतला आहे.
आयकर विभागाने संबंधित सर्वांना आयकर कायदा, १९६१ च्या सर्व टीडीएस तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. अशी माहिती आयकर विभागाचे अधिकारी मनू भारद्वाज यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *