धुळे जिल्हा
धुळे येथे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पत्ते खेळून निषेध करण्यात आला. कोकाटे हे कृषिमंत्री म्हणून धुळे जिल्ह्या दौर्यावर आल्यास त्यांच्या गळ्यात पत्त्यांचा हार घालून स्वागत करु असा इशारा यावेळी देण्यात आला.
आज सकाळी धुळे शहरातील गांधी पुतळा चौकात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. यासंदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले यांनी म्हटले आहे, की महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विविध कारणाने कुप्रसिद्ध झाले आहेत. मध्यंतरीही कोकाटे यांनी कृषी विभागातील कर्मचार्यांना अरेरावी केली. शेतकरी हे मुलांच्या लग्नांमध्ये पैशाची उधळपट्टी करतात असे बेताल वक्तव्य केले.स्वतःच्या घर खरेदीतही कोकाटे यांनी सामान्य लोकांची फसवणूक केली आहे.
मंत्री कोकाटे यांच्या या एकूणच कृत्यांमुळे ते बदनाम झाले आहेत.त्यांच्याबद्दल शेतकर्यांमध्ये मोठी नाराजी आहे.शेतकर्यांना दिला जाणारा एक रुपयाचा विमादेखील बंद केला.ऐवढ्यावरच न थांबता विधानसभेमध्ये शेतकर्यांच्या प्रश्नावर चर्चा चालू असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्याकडील मोबाईलवर पत्त्यांचा रमी खेळत होते.हा प्रकार म्हणजे राज्यातील शेतकर्यांचा थट्टाच आहे.शेतकर्यांविषयी कोकाटे यांच्या मनात कुठल्याही प्रकारची आपुलकी नाही असे त्यांच्या कृतीतून उघड झाले आहे.अशी माणसे राज्यात कृषी मंत्री म्हणून सत्तेवर राहणे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे.
माणिकराव कोकाटे हे कृषिमंत्री म्हणून धुळे जिल्ह्या दौर्यावर आल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीतर्फे (शरदचंद्रजी पवार) त्यांच्या गळ्यात पत्त्यांचा हार घालून स्वागत करु असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले, नंदू येलमामे, भिका नेरकर, अशोक धुळकर, दीपक देवरे, यशवंत पाटील,अमित शेख, राजेंद्र सोलंकी, मंगलदास वाघ, जितू पाटील, चिराग देसले, भटू पाटील, राजू चौधरी, डी टी पाटील, निखिल मोमया, नूर शाह, उजैर शेख, राजू मशाल, संजय नेतकर, जगन बापू ताकटे, सोनु गुजर, कल्पेश मगर, गोलू नागमल, सोनू घारु,इतर सहकारी, कार्यकर्ते,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.