धुळे जिल्हा
वाढती लोकसंख्या ही राष्ट्रीय समस्या असून जनजागृती व योग्य उपाययोजना यांच्यामार्फत यावर नियंत्रण शक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर यांनी केले.
धुळे जिल्हा व स्त्री रुग्णालय, धुळे येथे जागतिक लोकसंख्या सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ताजी देगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच इनरव्हील क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. दीपप्रज्वलन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगावकर, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सौ. शर्मिला पाटील आणि सचिव सौ. दीपमाला पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. गीतांजली सोनवणे यांनी लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम, महिलांचे आरोग्य आणि कुटुंब नियोजन यावर माहितीपर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणार्या अधिकारी आणि कर्मचार्यांना डॉ. देगावकर यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.