शिरपूर तालुक्यात पकडला ४२ लाखांचा गांजा

धुळे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
शिरपूर तालुक्यात पकडला ४२ लाखांचा गांजा

धुळे जिल्हा

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात चलारे-टिटवा शिवारात असलेल्या एका शेतातील घरात छापा टाकत धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने ४२ लाख ३५ हजार रुपये किमतीचा तब्बल सहा क्विंटल पाच किलो अमलिपदार्थ गांजा जप्त केला आहे.

पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे २८ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. शिरपूर तालुक्यातील चिलारे गाव शिवारात टिटवा गावाकडे जाणार्‍या रस्त्यावरील शेतातल्या एका घरात विक्री करण्याच्या उद्देशाने अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या साठवणूक करण्यात आली अस्याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेचे पथक संबंधित ठिकाणी धडकले. यावेळी रविंद्र गणेशा पावरा याने गांजाची साठवणूक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना यासंदर्भात माहिती दिल्यावर निरीक्षक श्रीराम पवार यांनी शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्यासह दोन पथक तयार केले आणि करुन छापा टाकला.यावेळी घटनास्थळी आढळलेला अमलीपदार्थ गांजा हस्तगत करण्यात आला.आरिफ रमजान पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित रविंद्र गणेश पावरा, रा. चिलारे (ता. शिरपूर) यांच्या विरुध्द गुंगीकारक औषधे द्रव्ये आणि मनोव्यापारावर परीणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क), २०(ब) (ळळ) (क),२२ (क) व २९ (एनडिपीएस) अन्वये शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम पवार,जयपाल हिरे,पोउनि.अमित माळी, पोउनि. सुनिल वसावे, शिरपूर तालुका पो. ठाणे, तसेच पोहवा.आरीफ पठाण, पोहवा. पवन गवळी, पोहवा.पंकज खैरमोडे, पोकॉ. मयूर पाटील, पोकॉ. योगेश जगताप, पोकॉ. जगदीश सुर्यवंशी, पोकॉ. कमलेश सुर्यवंशी, पोकॉ. राहुल गिरी, चालक पोकॉ. गिते, पोकॉ. गुलाब पाटील सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, धुळे तसेच पोहवा. राजू ढिसले, पोकॉ. प्रकाश भिल, पोकॉ. ग्यानसिंग पावरा, पोकॉ. रोहिदास पावरा, सर्व नेमणूक शिरपूर तालुका पोलीस स्टेशन यांनी संयुक्तिकपणे केली अशी माहिती देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *