‘पुष्पा स्टाईल’ने तेलाचे टँकरमधुन अवैध विदेशी दारुची तस्करीचा पोलिसांनी केला ‘पर्दाफाश’

‘पुष्पा स्टाईल’ने तेलाचे टँकरमधुन अवैध विदेशी दारुची तस्करीचा पोलिसांनी केला ‘पर्दाफाश’

 एक कोटीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखाने केला जप्त

धुळे शहर

हरियाणा येथून गुजरातमध्ये पुष्पा स्टाईलने दारूची अवैधरित्या तस्करी करण्याचा डाव उधळून लावत धुळे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका तेलाच्या टँकर मधून लाखोंचा विदेशी दारू साठा पकडला. 1 कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना मिळालेल्या गोपनीय बातमी मिळाली की, हरियाणा येथून खाद्य तेलाच्या टँकमधून विदेशी दारूची तस्करी गुजरात राज्यात होणार आहे त्यानुसार मा. पोलीस अधीक्षक, श्रीकांत धिवरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, धुळे व नरडाणा पोलीस ठाणे यांचे संयुक्त पथक तयार करुन नाकाबंदी कामी रवाना केले. गोपनीय बातमीच्या अनुषंगाने मुंबई महामार्ग क्रमांक-3 वर आकांक्षा हॉटेल च्या पुढे चहाच्या टपरी जवळ मोकळया जागेत नाकाबंदी दरम्यान गोपनीय बातमीतील टाटा कंपनीचे 22 चाकी टायर असलेले वाहन क्रमांक GJ-12 BV5015 हे मिळून आले. नमुद टैंकर वरील चालक मोहनलाल पुरखाराम जाट, वय-25 वर्ष, रा.बरेवालातला, पो. सदर बाडमेर जि. बाडमेर (राजस्थान राज्य) यास टँकरमधील माला बाबत विचारपुस केली असता, चालकाने त्यात खाद्य तेल असल्याचे सांगीतले. चालकाचे बोलण्याचा संशय आल्याने व गोपनीय बातमीची खात्री करणेकरिता टँकरची पहाणी केली असता, टँकरच्या आतमध्ये लोखंडी पत्र्याच्या सहाव्याने सहा कप्पे तयार करण्यात आलेले होते व त्यांचे झाकण नट बोल्टने फिट करुन वेल्डींग केलेले होते. पंचासमक्ष टँकर मधील कप्यांचे झाकण गॅस कटरने उघडुन पाहिले असता, त्यातील सहा कप्प्यांपैकी चार कप्यांमध्ये खालील वर्णनाचा व किंमतीची विदेशी दारु लपवून ठेवल्याचे दिसून आले. मिळून आलेल्या विदेशी दारूचे वर्णन खालीलप्रमाणे.

42,48,000/- रु.किं.चे All Season Rare Collection Reserve Whisky 750 ml विदेशी दारु बाटली. एकुण 295 बॉक्स मध्ये 3540 बाटल्या. (एका बाटलीची किंमत 1,200/- रु.)

8,98,800/- रु.कि.चे Royal Challenge Gold Whisky 750 ml विदेशी दारु बाटली. एकुण 70 बॉक्स मध्ये 840 बाटल्या. (एका बाटलीची किंमत 1,070/- रु.)

4,49,400/- रु.कि.चे Royal Stag Classic Whisky 750 ml विदेशी दारु बाटली. एकुण 35 बॉक्स मध्ये 420 बाटल्या. (एका बाटलीची किंमत 1,070/- रु.)

45,00,000/- रु.किं.चे टाटा कंपनीचा 22 टायरचा टँकर क्रमांक GJ-12/BV5015. टँकरवर Only Edible Oil असे लिहीलेले. असा 1, कोटी 00,96,200/- रु.कि.चा एकुण विदेशी दारु व टैंकर जप्त करण्यात आला आहे.

अशाप्रकारे पुष्या स्टाईलने खाद्य तेलाचे टँकरमधुन अवैध दारुची तस्करी करतांना एकुण 55,96,200/- रु. किंमतीच्या 400 बॉक्स मधून 3600 लिटर विदेशी दारु आणि 45,00,000/- किं.चे टैंकर असे एकुण 01,00,96,200/- रु.किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आरोपी चालक मोहनलाल पुरखाराम जाट, वय-25 वर्ष, रा. बरेवालातला, पो. सदर बाडमेर जि. बाडमेर (राजस्थान राज्य) याने त्याचे ताब्यातील टॅकर मध्ये वर नमुद किंमतीचा व वर्णनाचा माल हा खाद्यतेल असल्याचे भासवून, जाणूनबुजून, बेकायदेशीररित्या विना परवाना विदेशी दारुची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने हरियाणा येथुन धुळे (महाराष्ट्र) मार्गे गुजरात राज्यात घेवून जात असतांना मिळुन आला म्हणुन त्याचेविरुध्द महाराष्ट्र प्रोव्हीबिशन कायदा 1949 कलम 90, 81, 65 (अ), 65 (ई), 80, 83, 103 सह BNS क.318(2) अन्वये नरडाणा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदर विदेशी दारुचा मुळ स्त्रोत व कोणाकडे माल विक्रीसाठी जात होता याचा तपास सुरु आहे.

सदर कामगिरी श्री. श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक धुळे, श्री. अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक धुळे यांचे मार्गदर्शनाखाली श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धुळे, सपोनि.निलेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि. चेतन मुंडे, पोलीस अंमलदार पवन गवळी, आरीफ पठाण, देवेंद्र ठाकुर, राहुल सानप, मयुर पाटील तसेच नरडाणा पोलीस ठाणेचे अंमलदार रविंद्र मोराणीस, ललित पाटील, राकेश शिरसाठ, योगेश गिते व मोरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *