स्वातंत्र दिनानिमित्त मिलपरिसरातून भव्य ६०० फुट ध्वजासह अखंड भारत संकल्प तिरंगा रॅलीचे आयोजन – अमोल मासुळे

धुळे शहर

७९ व्या भारतीय स्वातंत्र दिना निमित्त मिलपरिसरातून प्रथमच भव्य अशी ६०० फूट तिरंगा ध्वजासह अखंड भारत संकल्प तिरंगा रॅलीचे आयोजन भारतीय जनता पक्षाचे पश्‍चिम मंडल अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अमोल उर्फ बंटी मासुळे यांच्या पुढाकाराने उद्या दि. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता क्रांती चौक, चितोड रोड येथून करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

सदर उपक्रम भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रेरणेने आणि संकल्पनेतून तसेच भाजपा प्रदेशअध्यक्ष श्री.रवींद्रजी चव्हाण साहेब,पालकमंत्री मा.ना.श्री.जयकुमारभाऊ रावल साहेब,भाजपा प्रदेश महामंत्री मा.विजयभाऊ चौधरी,धर्मयोद्धा कार्यसम्राट आमदार श्री.अनुपजी भैय्या अग्रवाल,मा.केंद्रीय राज्यमंत्री डॉ.श्री.सुभाषजी बाबा भामरे, मा.आमदार श्री.राजवर्धनजी कदमबांडे, भाजपा जिल्हाध्यक्ष मा.गजेंद्रजीशेठ अंपळकर यांच्या मार्गदर्शनात आणि श्री व्दारकाधीश प्रतिष्ठानचे संस्थापक परम् गौभक्त रविंद्र बापुजी शेलार यांच्या प्रेरणेने प्रथमच मिलपरिसरात आयोजित करण्यात आला आहे.

उद्या दि. १५ ऑगस्ट २०२८ रोजी सकाळी ८ वाजता क्रांती चौक, चितोड रोड येथून या भव्य तिरंगा यात्रेला प्रारंभ होणार आहे. ही तिरंगा यात्रा चितोड नाका, श्रीराम एसटीडी, दूध डेअरी रोडने, हरीओम कॉलनी, श्रीराम नगर येथून, रासकर नगर, शिवसागर कॉलनी या मार्गे चितोड रोड ध्वज चौक, क्रांती चौक येथे आल्यावर तिचा समारोप केला जाणार आहे.

या तिरंगा यात्रेत मिलपरिसरातील परिवर्तन विद्यालय, समता विद्यालय, अहिरे शाळा अशा विविध शाळेंचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मिलपरिसरातील विविध मित्र मंडळांचे तरुण कार्यकर्ते, देशप्रेमी नागरीक, बंधू भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तरी तमाम मिलपरिसरातील नागरीकांनी या भव्य तिरंगा रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने बंटी मासुळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *