दहशतवादी हल्लयाचा निषेध करीत
राष्ट्रवादीने जाळले पाकिस्तानी ध्वज
धुळे जिल्हा
जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या भिषण दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट पसरली असून आज पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा निषेध करीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने धुळ्यात निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करुन पाकिस्तानचे प्रतिकात्मक ध्वज जाळण्यात आले.
काल जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी निरपराध भारतीय पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये जवळपास २७ भारतीय नागरिकांचे प्राण गेले. या घटनेचा निषेध म्हणून आज बुधवारी दुपारी धुळे शहरात महापालिकेसमोर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाने निदर्शने करून निषेध व्यक्त केला.
यावेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचे झेंडे जाळून पाकिस्तान आणि आतंकवादी विरोधात घोषणाबाजी केली. तसेच भारतीय सरकारने तातडीने कठोर कारवाई करून जशास तसे उत्तर त्यांना द्यावे. असे आवाहन केले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले, जगन बापू ताकटे, डी टी पाटील. शेख युसुफ , अशोक धुलकर, भीका नेरकर, राजू सोलंकी, सोनू गुजर, रामेश्वर साबरे, निखिल मोमया, जितू पाटील, दीपक देसले, मंगलदास वाघ, दीपक देवरे, भोला सैंदाणे, स्वामिनी पारखे, उजेर शेख, राजेंद्र चौधरी, चिराग देसले, धनंजय पाटील, बंटी वाघ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.