“भ्रष्टाचार व गुंडगिरी मुक्त महापालिका” या एकमेव कार्यक्रमावर पालीकेच्या निवडणूका व्हाव्यात – मा. आ. अनिल गोटे

• “भ्रष्टाचार व गुंडगिरी मुक्त महापालिका” या एकमेव कार्यक्रमावर पालीकेच्या निवडणूका व्हाव्यात – मा. आ. अनिल गोटे

• तो दिवस दूर नाही, भारतातही राजकाऱ्यांना जनता शोधून शोधून मारेल !

• ज्यांना महापालिका लढवायची आहे, अशा संभाव्य उमेदवारांनी आपल्या प्रभागातील मतदार याद्या तपासून घ्याव्यात !

• धुळे शहरात विधान सभेला ४५ हजार बोगस मतदान !

शिवसेना नेते, माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांचे
खणखणीत इशारा देणारे पत्रक !

धुळे

धुळे शहरात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत, भ्रष्टाचार व दहशत, गुंडगीरी मुक्त महापालिका ही संकल्पना घेऊनच, निवडणुका लढवाव्या लागतील. अशी भूमिका शिवसेना नेते, माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी पत्रकाद्वारे मांडली आहे.

तसेच निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सल्ला दिला आहे की, माझी सर्व पक्षाच्या संभाव्य उमेदवारांना विनंती आहे की, आपले प्रभाग प्रसिद्ध झालेले आहेत. मतदार यादी घेऊन, आपल्या कार्यकर्त्यांसह घरोघर जा! तो मतदार तेथे राहतो की नाही, ते पहा! धुळे शहर सोडून गेलेल्या आणि मेलेल्या लोकांच्या नावावर सुद्धा, विधानसभा निवडणुकीत मतदान झालेले आहे. २७ हजार लोकांचे डुब्लीकेट मतदान झाले आहे. धुळे शहर कायमसाठी सोडून गेलेले, स्वर्गवासी झालेले, अदृश्यपणे येऊन त्यांनी मतदान केले. त्यांचा आकडा १८ हजाराच्या आसपास आहे. असा दावा देखील गोटे यांनी पत्रकात केला आहे.

त्यांनी नेपाळमध्ये सुरू असलेल्या अराजकतेवर ही भाष्य केले आहे.  नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका या आजूबाजूच्या राष्ट्रांमध्ये बेबंदशाही, सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही वर्तणूक, घटनेची पायमल्ली, प्रचंड भ्रष्टाचार आणि धार्मिक तेढ इत्यादी कारणांमुळे आंदोलनाला नेत्याचा चेहरा नसतानाही, तरुणांनी स्वयंस्फूर्तीने एकत्र येऊन, सत्ता उलथवून टाकली. एवढेच नव्हे तर, अशा सर्व कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्या राजकारण्यांना, अक्षरशः शोधून-शोधून, “हाग्या मार” दिला. आंदोलनाचे वैशिष्ट्य असे की, आंदोलकांनी प्रारंभच राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्री यांच्यापासून केला. तरुणांचा उद्रेक एवढा होता की, त्यांनी लोकसभेची इमारत जाळून टाकली. अर्थात हे समर्थनीय होऊ शकत नाही. पण लोकउद्रेक झाल्यानंतर मर्यादा राहत नाही. नेपाळमध्ये तर, माजी पंतप्रधानांच्या पत्नीला भर चौकात जाळून टाकले. तरुणांचा उद्रेक एवढा भयंकर होता की, पंतप्रधानांना सरकारी हेलिकॉप्टर व विमानातून पळून जाणे सुद्धा कठीण झाले होते. भ्रष्टाचार ही वृत्ती नसून, हा एक रोग आहे. तो समुळ नष्ट करावा लागेल. यासाठी आपल्या गावापासून अन् घरापासून सुरुवात करावी लागेल, असे माझे स्पष्ट मत आहे.

धुळे शहरात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत, भ्रष्टाचार व दहशत, गुंडगीरी मुक्त महापालिका ही संकल्पना घेऊनच, निवडणुका लढवाव्या लागतील. कारण सट्टा, जुगार, हातभट्टी, अमली पदार्थ, गांजा अशा अवैध व्यवसायातून ज्यांच्याकडे अमाप पैसा आला. अशा लोकांना समाजात स्थान असत नाही. मग समाजामध्ये प्रतिष्ठा मिळिवण्याकरिता त्यांना पद आवश्यक असते. सत्तालालची व सत्ता लोलूप पक्ष, अशा लोकांना होलसेल मध्ये आपल्या पक्षात घेऊन, कसेही करून, कुठल्याही मार्गाने तो निवडून आला पाहिजे, तसेच पक्षाला एक कोटी रुपये निधी दिलाच पाहीजे. अशा अटीवरच पक्षाचे संरक्षण मिळवून देतात. यासाठी लाचार पोलिसांना हाताशी धरणे, अधिकाऱ्यांमधल्या टाकाऊ आणि विकाऊ अधिकाऱ्यांची रोखठोक खरेदी करणे, त्यांना ब्लॅकमेल करून व भीती दाखवून, आपले अश्रीत बनविणे या अटी, शर्तीखाली उमेदवारी देऊन, प्रतिष्ठा प्राप्त करून देतात. अशा प्रवृत्तीच्या लोकांना, त्यांचा पक्ष, विचार कधी असत नाही. त्यांचे रक्षण करेल तोच त्यांचा पक्ष.

नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका ही सर्व आंदोलने चेहराहीन आहेत. या आंदोलनाला नेता नाही. तरीही देशातील सर्वोच्च पद उपभोगलेल्यांना जीव वाचवण्यासाठी पळून जावे लागते, ही अत्यंत चिंतेची बाब आहे. भारताच्या राजकीय पार्श्वभूमीवर, माझ्यासारख्या सामान्य माणसाला चिंता सतावते की, असेच सुरू राहिले तर, आपल्या देशाच्या दृष्टीने तो दिवस दूर नाही, अशी रास्त भीती वाटते. भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांना जनता शोधून-शोधून, टिपून काढल्याशिवाय राहणार नाही. याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. ‘विरोधी पक्ष आरोप करतात निवडणूक आयोगाच्या वर्तणुकीवर आणि उत्तर देतात भाजपाचे नेते.’ हे कधीही समर्थनीय होऊ शकत नाही. याचा अर्थ ‘जखम पायाला, आणि मलम शेंडीला असा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर धुळे महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. माझी सर्व पक्षाच्या संभाव्य उमेदवारांना विनंती आहे की, आपले प्रभाग प्रसिद्ध झालेले आहेत. मतदार यादी घेऊन, आपल्या कार्यकर्त्यांसह घरोघर जा! तो मतदार तेथे राहतो की नाही, ते पहा! धुळे शहर सोडून गेलेल्या आणि मेलेल्या लोकांच्या नावावर सुद्धा, विधानसभा निवडणुकीत मतदान झालेले आहे. २७ हजार लोकांचे डुब्लीकेट मतदान झाले आहे. धुळे शहर कायमसाठी सोडून गेलेले, स्वर्गवासी झालेले, अदृश्यपणे येऊन त्यांनी मतदान केले. त्यांचा आकडा १८ हजाराच्या आसपास आहे. या विषयावर दिनांक १५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता मी पत्रकार परिषदेचे आयोजन केलेले आहे. त्यात सर्व पुरावे मी जनतेसमोर आणणार आहे. मी एवढेच सांगतो की, ज्यांना कुणाला पालीका निवडणूका लढवायच्या असतील त्यांनी, या सर्व परिस्थितीचा विचार करून, आजच कामाला लागावे. प्रभाग तोडणे, आपला प्रभाग तिकडे गेला. तुमचा प्रभाग इकडे आला. हे सर्व प्रकार तुमची शक्ती वाया घालवण्याचा प्रकार आहे. त्यात तुम्ही शक्ती वाया घालवू नका. महापालिका प्रामाणिकपणे चालू शकते, हे कै. डॉ. रा. भ. चौधरी व सौ हेमा गोटे यांनी सिद्ध करून दिलेले आहे.

जोपर्यंत “भ्रष्टाचार हटाव, महापालिका बचाव” “आम्हाला चांगले रस्ते पाहिजे,” “गुंडगिरी मुक्त शहर पाहिजे,” “स्वच्छ शहर व भयमुक्त धुळे” या कार्यक्रमावरच मुख्यतः जनता तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. असा विश्वास पत्रकाच्या माजी आमदार अनिल गोटे यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *