धुळे जिल्हा
धुळे शहरात रस्त्याच्या कडेला पथारीवर आणि हातगाडीवर भाजीपाला तसेच विविध वस्तू विक्री करणाऱ्या व्यवसायिकांनी काढलेल्या मोर्चा नंतर मनपा आयुक्तांनी पुन्हा आग्ररोडवर रस्त्याच्या कडेला व्यवसाय करण्यास तात्पुरती परवानगी दिली.
महापालिका प्रशासन आणि पोलिस गेल्या तीन आठवड्यापासून पिटाळून लावत आहेत. हा अन्याय सहन करणार नाही. असा ईशारा शुक्रवारी संतप्त हातगाडीधारक आणि पथारीधारकांच्या वतीने महापालिकेवर मोर्चा काढत देण्यात आला.
यावेळी शिष्ट मंडळांने धुळे महापालिकेच्या आयुक्त सौ अमिता दगडे पाटील यांना लेखी निवेदन देऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या श्री.खंडेराव मंदिरापासून आज लोटगाडीधारक युनियनचे जिल्हाध्यक्ष महादेव भैय्या परदेशी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मुख्य मार्गावरून पेठ विभागात फेरा घालून हा मोर्चा जुने महापालिका इमारत आणि तेथून पुढे महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये पोहोचला.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष महादेव परदेशी म्हणाले की गेल्या तीन आठवड्यापासून जिल्हा पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन यांच्या संयुक्त कारवाई मधून आग्रा रस्त्यावर पथारी लावून बसणार्या व्यावसायिकांसह हात गाडी व्यावसायिकांवर कठोर कारवाईचा भडगाव उगारला जात आहे.हातगाडी व पथारी व्यवसायकांसाठी कुठेही व्यापारी संकुल किंवा इमारत उपलब्ध नसल्याने ते मुख्य बाजारपेठेमध्ये आपला रोज उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करतात. शासनाकडून नक्षलवाद्यांचे पुनर्वसन केले जाते, परंतु शहरात विविध व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करणार्या विक्रेत्यांची मात्र साधी दखलही घेतली जात नाही असा याचा अर्थ होतो.
यावेळी आयुक्त सौ.अमिता दगडे पाटील यांनी शिष्टमंडळाला सांगितले,की पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन यांच्यासह शहराचे आमदार अनुप भैय्या अग्रवाल यांच्या उपस्थितीत एक बैठक घेऊन त्यावर तोडगा काढण्यात येईल,तोवर रस्त्याच्या कडेला बसून व्यावसायिक व्यवसाय करू शकतात यासाठी वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.