धुळे गुंतवणूक परिषद 2025 यशस्वीतेसाठी आमदार अनुप अग्रवाल ‘ॲक्शन’ मोडवर!

आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक विकासास चालना देण्यासाठी पूर्वतयारी बैठकीत उद्योजकांसह विस्तृत चर्चा

धुळे शहर

धुळे येथे येत्या 28 एप्रिलला पहिली व्यापक अशी गुंतवणूक परिषद 2025 होत आहे. या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच धुळ्यात संपन्न झाली. या बैठकीचे आयोजन गुंतवणूक परिषदेचे मुख्य समन्वयक तथा धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. बैठकीत धुळे एमआयडीसीसह साक्री, नरडाणा आणि शिरपूर परिसरातील विविध औद्योगिक क्षेत्रातील प्रमुख उद्योजक व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ही बैठक धुळे जिल्ह्यचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून, त्यांच्या सूचनेनुसार धुळे गुंतवणूक परिषद महाराष्ट्रातील एक आदर्श परिषद ठरावी यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे ठरले.

आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांनी गुंतवणूक परिषदेमुळे धुळे जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या औद्योगिक संधींवर प्रकाश टाकण्यात आला , “धुळे जिल्हा हा उद्योग, रोजगार व आर्थिक विकासाच्या दृष्टीने पुढील टप्प्यावर नेण्याचा मानस असून, गुंतवणूक परिषद हे त्याचे एक प्रभावी माध्यम ठरेल.” यावेळी त्यांनी सर्व उद्योजकांना एकजूट होऊन परिषद यशस्वी करण्याचे आवाहन केले.

याबैठकीत प्रामुख्याने🔸एमआयडीसीचा विस्तार व औद्योगिक प्लॉटची उपलब्धता. 🔸विजेची समस्या संदर्भातील उपाय. 🔸नविन उद्योजकांसाठी शासनस्तरावर उपलब्ध होणाऱ्या सुविधा. 🔸गुंतवणूक परिषद 2025 साठी एमओयू (MoU) तयारी.  या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीला उपस्थित मान्यवरांमध्ये श्री ओमप्रकाशजी अग्रवाल, नितीन देवरे (धुळे अवधान मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन), भरत अग्रवाल (खानदेश औद्योगिक विकास संघटना), नितीन बंग (खानदेश औद्योगिक विकास परिषद), वर्धमान संघवी (लघुउद्योग भारती), महेश नावारकर (शेतकरी असोसिएशन), नितीन पाटील (स्टेटस ग्लोबल ट्रस्ट), श्री.संजय देसले, राहुल मुंदडा, जी.बी. मोदी, श्रीराम देशपांडे, राजेंद्र जाखडी, राहुल कुलकर्णी, राजेश गोंडोदिया, दिलीप अग्रवाल, सौरव जोशी, सागर जोशी आदींचा समावेश होता.

बैठकीचा मुख्य उद्देश म्हणजे गुंतवणूक परिषद 2025 मधून मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक आणून सदर गुंतवणुकीचे रूपांतर प्रात्यक्षिक मध्ये आणण्याचे देखील प्रयत्न करण्याचे सर्वानुमते ठरले.तसंच धुळे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणे आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीला चालना देणे हा देखील मुख्य उद्देश या बैठकीचा होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *