भूमि अभिलेख कर्मचार्‍यांचे सामुहिक रजा आंदोलन

भूमि अभिलेख कर्मचार्‍यांचे सामुहिक रजा आंदोलन

धुळे जिल्हा

भूमि अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य वतीने कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरु असून आज पासून सामुहिक रजा टाकत असहकार आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला आहे. धुळे येथील भूमि अभिलेख कार्यालयाच्या बाहेर सर्व कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी एकत्र येत धरणे देत आपल्या मागण्या पुर्ण करण्याची मागणी केली. यावेळी संत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.

भूमि अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य वतीने दि. १८ फेब्रुवारी रोजी मोजणी साहित्य कार्यालयात जमा करण्यात येवून दि.२० पर्यंत काळ्या फिती लावून फक्त कार्यालयीन कामकाज करावे. असहका आंदोलन दि.२३ ते २६ पर्यंत सामुहीक रजा टाकुन असहकार आंदोलन करण्यात येत आहे. तसेच दि.२७ रोजी मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात येईल. मागण्या मान्य न झाल्यास दि.०२/०३/२०२६ पासून बेमुदत कामबंद आंदोलन (संप) करण्यात येईल. असा इशाराही देण्यात आला.

यावेळी आनंदी तायडे जिल्हाध्यक्ष निलेश साळुंखे उपाध्यक्ष सिद्धार्थ मोरे, अंकुश चौधरी दीपक साळुंखे रवींद्र नंदन रितेश मानकर रवींद्र कवाडे नरेंद्र चव्हाण योगेश शिंत्रे राहुल बागुल दीपक सनेर धीरज चित्ते श्रीमती रत्नमाला साळुंखे निकिता पाटील प्रतिभा कारले भारती मराठे मयुरी भोई योगिता गटरी लक्ष्मी लोहार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *