महाराष्ट्राला मिळाल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
राज्यपाल आचार्य देवव्रत यांचेकडून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ
मुंबई, दि. 31 :
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सुनेत्रा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर चौथ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदासह राष्ट्रवादीच्या नेतेपदा सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री देखील लाभल्या आहेत.

आज शनिवारी सांयकाळी लोकभवन येथे साधेपणाने झालेल्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राज्य मंत्रिमंडळाचे सदस्य, लोकप्रतिनिधी, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचेसह सुनेत्रा पवार यांचे कुटुंबीय आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
