धुळे शहर
– पोलीस असल्याचे भासवून ३५ ते ४० वयोगटातील दोघा भामट्यांनी पुन्हा एकदा देवपुरात एका वयस्कर इसमाला लुबाडले, त्याच्याकडील दोन सोन्याच्या अंगठ्यावर एक चैन असे एक लाख वीस हजार रुपयांचे दागिने ताब्यात घेऊन दोघेही पसार झाले.
नारायण अर्जुन पाटील रा.अण्णासाहेब पाटील नगर, चक्करबर्डी रोड धुळे यांना गंडा घालण्यात आला. २७ मे रोजी दुपारी तीन वाजेला धुळे शहरातील दत्त मंदिर जवळ असलेल्या हिम हॉटेलच्या अलीकडील रस्त्यावर ही ठकबाजी झाली.
’पुढे लायसन चेकिंग चालू आहे, आपण आपल्या अंगावर एवढे सोने का घालतात, असे म्हणत दोन्ही भामट्यांनी नारायण पाटील यांना त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने एका कागदी उपुडीद बांधण्याचा सल्ला दिला. नारायण पाटील यांच्याकडील दोन तोळे वजनाची सोन्याची चैन व दोन तोळे वजनाच्या दोन अंगठ्या असे दागिने कागदात बांधण्याचा केवळ भास निर्माण केला आणि या कागदी पुडीची काही कळण्याच्याआत अदलाबदल करून दोघांनी नारायण पाटील यांच्याकडील किमती दागिने लंपास केले.लांबविण्यात आलेल्या या दागिन्यांची किंमत एक लाख २० हजार रुपये आहे.याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध थकबाजीचा गुन्हा दाखल झाला आहे.