एलसीबीने धुळ्यात पकडली करोडोची सुपारी

प्रतिबंधीत सुंगधी सुपारीची बेकायदा वाहतुक
करणारे सात कंटेनर वाहन धुळ्यात पकडले

धुळे जिल्हा

महाराष्ट्रातील सुगंधी सुपारी मालाची अवैधरित्या वाहतुक करणार्‍या सात वाहनांवर धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. या कारवाईत ७ वाहनांसह जवळपास दोन कोटी ५२ लाख ९२ हजार ४६४ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती आज पोलिसांच्या वतने देण्यात आली.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशान्वये धुळे जिल्हयात ३० एप्रिल रोजी नाकाबंदी करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ही वाहने पकडली. यात कनार्टक राज्य पासिंगचे चारचाकी वाहनेही आहेत.पकडण्यात आलेल्या वाहनांचे क्रमांक असे-केऐ -१४ सी -३३७८,केऐ १४ सी- ७३०५,केऐ १४-सी-५६४६,केऐ १४ सी-५२७८,केऐ १४ सी-५६१४,केऐ १४ सी-३०९० व जीजे ३३ टी-५९९९.
पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे आणि अंमलदार यांच्यासह अन्य सहकार्‍यांनी पहाटे मोहाडीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुंबई-आग्रा महामार्गावर पाच तर साक्री पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन अशी सात वाहने ताब्यात घेतली. या वाहनांवरील चालकांना वाहनातील माल कागदपत्रा बाबत विचारपुस केली असता, त्यांनी नागपूर येथून सुपारी भरुन धुळे मार्गे गुजरात राज्यात घेवून वाहतुक करीत असल्याचे सांगीतले. त्यांना कागदपत्र हजर करण्यासाठी वेळ दिल्यानंतरही त्यांनी मुदतीत कागदपत्रे हजरकेले नाहीत.असे पोलिसांचे म्हणणे आहे.

जप्त वाहनातील सुपारीचा दर्जा, ई-वे बिल आणि जी.एस.टी. च्या पावत्याबाबत संशय आल्याने सहायक आयुक्त-अन्न व औषध प्रशासन विभाग, धुळे आणि केंद्रीय वस्तु व सेवा कर विभाग, नाशिक यांना माहिती देण्यात आली.

ही कारवाई पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि श्रीराम पवार, उप निरी. अमरजित मोरे, असई संजय पाटील, हे कॉ. सदेसिंग चव्हाण, प्रशांत चौधरी, दिनेश परदेशी, तुषार सुर्यवंशी, पंकज खैरमोडे, पो कॉ. महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, किशोर पाटील, अमोल जाधव, कैलास महाजन तसेच पोसई बाळासाहेब सुर्यवंशी, संजय पाटील, मच्छिंद्र पाटील, संदीप पाटील, योगेश चव्हाण, हेमंत बोरसे, प्रलहद वाघ, अमोल जाधव यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *