धुळ्यात गोळीबार करून ३५०० ग्रॅम सोन्याचे दागिणे लुटणाऱ्या  दरोडेखोरांची आंतरराज्य टोळीस एलसीबीने केले जेरबंद 

धुळे जिल्हा

धुळे शहरातील सावरकर पुतळा चौक, देवपूर येथे बंदूकीतून ०३ गोळ्या झाडत मुंबईतील सराफा व्यापाऱ्यांवर दरोडा घालणाऱ्या कुख्यात आंतरराज्यीय टोळीला धुळे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. यात दोघांनाही अटक करून 24 लाख 51 हजार 700 रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे, एक स्विफ्ट कार आणि एक गावठी पिस्टल स्टील असा मुद्येमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

या विषयी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी सांगितले की, दि. २३/०७/२०२५ रोजी रात्री ०८.०० वाजेच्या सुमारास धुळे शहरात सावरकर पुतळ्याजवळ शहादा कडून आलेल्या एस. टी. बस मधुन विनय मुकेश जैन आणि त्याचा सहकारी कर्षण रुपाभाई मोदी उतरल्यावर एका काळया रंगाची मोटार सायकलवर अज्ञात तीन इसमांनी तोंडाला काळे मास्क लावून व हेलमेट आणि तोंडाला मास्क लावून पिस्टलचा धाक दाखवुन विनय मुकेश जैन यांना गंभीर दुखापत पोहचविण्याच्या उददेशाने फायर करून त्यांचे जवळील ३५०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व सोन्याच्या पावत्या असलेली काळया रंगाची बॅग बळजबरीने हिसकावून पळून गेले होते. तक्रारदार विनय मुकेश जैन यांचे तक्रारीनुसार देवपूर पोलीस स्टेशन गुरनं. १५४/२०२५ भारतीय न्याय संहिता क. ३११ सह भारतीय हत्यार कायदा क. ३/२५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आलेला होता.

. पोलीस अधीक्षक, धुळे यांचे आदेशानुसार सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. सदर गुन्हयात आरोपींना ओळखणारे कोणतेही साक्षीदार नसतांना शासनाकडून धुळे शहरात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरांचा आधार घेवून गुन्हयाचे घटनास्थळावरुन येणारे जाणारे सर्व रस्त्यावरील सर्व हजारो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची तपासणी करुन संशयित वाहनांचे नंबर मिळविण्यात आले. गुन्हयातील आरोपी मुंबई कडून आल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपींचा मुंबई येथे शोध घेत असतांना मुंबई मध्ये ओला उबेर कंपनीत टॅक्सी चालविणारे प्रतापगढ़ (उत्तरप्रदेश) येथील रहिवाशी असलेले आरोपींनी सदर गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार सदर आरोपीचा मुंबई येथे शोध घेत असतांना ते उत्तरप्रदेश येथे पळून गेल्याने त्यांचा प्रतापगढ (उत्तरप्रदेश) येथे शोध घेत असतांना आरोपी नामे १) मोहंमद शहरेयार मोहंमद इबरार खान, वय २४, रा. ग्राम बहरापूर, थाना मांधाता, जि. प्रतापगढ उत्तरप्रदेश, ह. मु. वडाळा, मुंबई, २) दिलशान इमरान शेख, वय २१, रा. यहियापूर, थाना दिलीपपूर, जि. प्रतापगढ, उत्तरप्रदेश, ह. मु. सुंदरबाग, कुर्ला, मुंबई यांचा गुन्हयात सहभाग असल्याचे दिसून आले.


सदर दोन्ही आरोपी प्रतापगढ़ (उत्तरप्रदेश) येथे खुनाचा प्रयत्न या सदराखाली दाखल गुन्हयात अटक झाल्याची माहिती मिळून आली होती. त्यानुसार प्रतापगढ़ (उत्तरप्रदेश) पोलीस आणि न्यायालयाशी पत्रव्यवहार करुन वर नमुद आरोपीतांना प्रतापगढ़ (उत्तरप्रदेश) येथून ट्रान्सपर करुन नमुद गुन्हयात दि. २३/०८/२०२५ रोजी अटक करण्यात आले होते.

दोन्ही आरोपींकडे तपास करतांना त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांचे कडून दोन्ही आरोपी यांचेकडून एकूण 262.800 ग्रॅम वजनाचे  24 लाख 51 हजार 700 रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे, एक पांढरे रंगाची मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट  एम. एच. 15/ईबी 4516 नंबर असलेली कार एक गावठी पिस्टल स्टील मॅगझीन सह मुद्येमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई श्रीकांत धिवरे, पोलीस अधीक्षक, धुळे अजय देवरे, अपर पोलीस अधीक्षक, धुळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पो.नि. श्रीराम पवार, पोउनि. चेतन मुंढे, सहा. पोउनि. सतिष जाधव, पोहवा. राहुल सानप, पोहवा. आरीफ पठाण, पोहवा. पवन गवळी, पोहवा. देवेंद्र ठाकुर, पोकों. मयूर पाटील तसेच सहा. पोउनि. संजय पाटील, पोकों. अमोल जाधव, चा.पो.हवा. कैलास महाजन अशांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *