कुणबी मराठा एकच ! शासन निर्णय झाल्या शिवाय आता मुंबईतून माघार नाही !! मनोज जरांगे पाटलांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

येत्या 27 ऑगस्ट पर्यंत सरकारला दिला शेवटचा अल्टिमेटम

सोलापूर

मराठा आणि कुणबी एकच असून याचा शासन निर्णय तातडीने सरकारने काढावा अन्यथा मुंबई सोडणार नाही शासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घ्यावी 27 ऑगस्ट च्या आत निर्णय जाहीर करावा अन्यथा होणाऱ्या परिणामाला सरकार जबाबदार राहील असा स्पष्ट इशारा मराठा आंदोलनचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला दिला आहे.

मनोज जरांगे हे बुधवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

यापूर्वी आपण मुंबईला गेलो होतो त्यावेळी मुंबई गाठण्यापूर्वी सरकारने आपल्याला आरक्षणाचे आश्वासन देऊन परत पाठवले होते त्यानंतर आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही सरकारने आपली फसवणूक केली आता यापुढे कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असा इशारा देत आता आरक्षणासाठी आपण 29 ऑगस्ट पर्यंत च्या आंदोलनावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्टपणे जाहीर केले.

27 ऑगस्ट रोजी सकाळी अंतर्वली सराटी येथून मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत या यावेळी प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक वाड्या वस्तीतील मराठा समाजातील युवकांनी नागरिकांनी आपल्या मुलांच्या कल्याणासाठी या आंदोलनात सहभागी व्हावे आणि मुंबईच्या दिशेने एक दिवस यावे असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.

महाराष्ट्रात 58 लाख जणांच्या नोंदी सापडल्याचा अहवाल सरकारच्या समितीने दिला आहे आणि हा अहवाल सरकारकडे आहे त्यामुळे सरकारने आता उर्वरित सर्व मराठ्यांना मराठ्यांचा कुणबीत समावेश करावा अशी मागणी देखील जरांगे यांनी यावेळी केली यावेळी माऊली पवार राजन भाऊ राजन जाधव रवी मोहिते विनोद भोसले यांच्यासह अनेक मराठा समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *