5
धुळे
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी साजरी करण्यात येणार आहे. त्याचे औचित्य साधुन धुळ्यात रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता “जय भीम पदयात्रा” चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
राज्य शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 व्या जयंती निमित्ताने सर्व जिल्हयात जय भीम पदयात्रा आयोजन करण्याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार धुळे जिल्हयात जिल्हा क्रीडा अधिकारी धुळे व जिल्हा प्रशासन, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, एनएसएस, एनसीसी, एनवायके, विविध खेळ संघटना व इतर यांच्या संयुक्त विद्यमाने 13 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 7.30 वा. जयभीम पदयात्राचे आयोजन करण्यात येणार आहे.
*जय भीम पदयात्रेचा मार्ग*
जय भीम पदयात्रा सकाळी 7.30 वाजता गरुड मैदान,धुळे येथुन सुरुवात होवुन जेल रोड मार्गे पोलीस अधिक्षक कार्यालयाजवळ समाप्त होईल .
या पदयात्रेत धुळे शहरातील सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थाचे मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी आपल्या शाळा, विद्यालये, महाविद्यालये, शैक्षणिक संस्थामधील खेळाडु, एन.सी.सी. व एन.एस.एसचे विद्यार्थी,नागरिकांनी मोठ्या संखेने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.टिळे यांनी केले आहे.
00000