महसुलमंत्री, पालकमंत्र्यासह वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीत
धुळ्यात सोमवारी औद्योगिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन
धुळे जिल्हा
धुळे जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक आकर्षिंत करुन जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्याच्या उद्योग संचालनालयाच्यावतीने सोमवार, २८ एप्रिल, रोजी सकाळी १० वाजता हॉटेल टॉपलाईन रिसॉर्ट येथे औद्योगिक गुंतवणूक परिषदेचे आयोजन केले आहे. अशी माहिती धुळे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या १०० दिवस कृति आराखड्यातर्ंगत राज्यात गुंतवणूकीस प्रोत्साहन देण्यासाठी तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला अधिक चालना मिळावी याकरीता उद्योग सहसंचालक, नाशिक विभाग आणि धुळे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या संकल्पनेतून या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या एक दिवसीय परिषदेचे उद्घाटन राज्याचे महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल हे भूषविणार आहे. तर या परिषदेचे दीपप्रज्वलन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते होणार आहे.
या परिषदेस प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ शोभा बच्छाव, खासदार ङ गोवाल पाडवी, आमदार सर्वश्री अमरिशभाई पटेल, किशोर दराडे, सत्यजीत तांबे, काशिराम पावरा, श्रीमती मंजुळा गावीत, अनुप अग्रवाल, राघवेंद्र पाटील हे उपस्थित राहणार आहे. तर मार्गदर्शक म्हणून उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे आहेत. या गुंतवणूक परिषदेचे समन्वयक म्हणून धुळे शहराचे आमदार अनुप (भैय्या) अग्रवाल हे आहेत.ङ्गङ्ग या गुंतवणूक परिषदेस सर्व क्षेत्रातील उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सौ. वृषाली सोने, सहसंचालक, उद्योग, नाशिक विभाग व धुळे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी यांनी संयुक्तपणे केले आहे.