धुळे जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस
धुळ्याला पाणीपुवठा करणारा नकाणे तलाव ओव्हर फ्लो
धुळे जिल्हा
धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नकाणे तलाव काठोकाठ भरला असून आज सकाळ पासून तलावाच्या साडव्यावरुन पाणी ओसंडून वाहू लागले आहे. धुळे तालुक्यात झालेल्या दमदार पावसामुळे नकाणे तलाव शंभर टक्के भरल्याने वर्षभराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न मिटला आहे.
धुळे शहर आणि जिल्ह्यात काल मध्यरात्री मुसळधार पाऊस बरसला. रात्रभर पावसाची रिपरीप सुरु होती. जिल्ह्यात २४ तासात दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्प भरले आहेत. यात प्रामुख्याने धुळे शहराजवळील नकाणे तलावाचा समावेश आहे. नकाणे तलावातून धुळे शहराला पाणीपुरवठा केला जातो. हा तलाव पुर्ण क्षमतेने भरला आहे. सांडव्यावरुन पाणी वाहत असल्याने येथील नाला देखील प्रवाहित झाला आहे. नागरीकांनी सांडव्यावर तसेच तलावात जावू नये असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
दरम्यान आज शनिवारी दुपारी पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाची सतत धार सुरू आहे.