खा.डॉ.शोभा बच्छाव यांच्या वतीने भिम नगरातील स्मारक सुशोभिकरणासाठी १० लाखांचा निधी

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांचे अभिवादन

धुळे जिल्हा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाजपरिवर्तनाचे, सामाजिक, आर्थिक समतेवर आधारित समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन खासदार शोभा बच्छाव यांनी भिम नगरात जयंती उत्सवाच्या प्रसंगी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्या कडून अनोखे अभिवादन करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सुशोभीकरण करणे कामाला १० लक्ष रुपयांचा खासदार स्थानिक विकास निधी मंजूर केला. यासाठी माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांनी १५ ऑगस्ट रोजी खासदार यांच्याकडे पत्रान्वये मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी सदरचे काम मंजूर करून दिले. येथे सुशोभीकरणासह विविध कामे होणार असून लवकरच कामाला प्रत्यक्ष सुरवात होणार असल्याची माहिती देखील देण्यात आली.

या प्रसंगी खासदार डॉ. शोभा बच्छाव यांच्यासह माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाठ, कुसुमताई शिरसाठ, धनराज शिरसाठ, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते हाजी ईस्माइल पठाण, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रणजीतराजे भोसले, डॉ. दिनेश बच्छाव आदी मान्यवर तथा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *