दोंडाईच्यात जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्धाटन ; 21 नामांकित कंपन्यांमध्ये 1 हजार पेक्षा अधिक रिक्त पदांची होणार भरती

धुळे जिल्हा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे व मॉडेल करिअर सेंटर आणि शिक्षण महर्षी दादासाहेब रावल नॉलेज सिटी, दोंडाईचा यांच्या संयुक्त विद्यमाने आज शिक्षण महर्षी दादासाहेब रावल नॉलेज सिटी, मांडळ रोड, दादा नगर, दोंडाईचा, ता. शिंदखेडा येथे सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेदरम्यान जिल्हास्तरीय पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे (ऑफलाईन-2) आयोजन करण्यात आले असून या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार आहे.

या मेळाव्यात दहावी पास किंवा नापास, बारावी, आय.टी.आय, बी.ए., बी.कॉम, एम.कॉम, बी.एस.सी, डिप्लोमा इंजिनिअर, बी.ई. डिप्लोमा, एम.बी.ए, डिप्लोमा ॲग्री, बी.एस.सी. ॲग्री, एम.एस.सी. ॲग्री या पात्रताधारक उमेदवारांसाठी 1 हजार 20 रिक्तपदे उपलब्ध असून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी विविध 21 कंपन्या व आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच कौशल्य विकास व स्वंयरोजगाराबाबत विविध महामंडळाचे स्टॉल्स लावून विविध अर्थसहाय्य योजनांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

*1 हजारहून अधिक जागांसाठी 21 नामांकित कंपन्या उपस्थित*

या मेळाव्यात मे.डिस्टिल एज्युकेशन ॲड टेक्नॉलॉजी यांची 300 पदे, युवाशक्ती फांऊडेशन, नाशिक 200 पदे, बॉश लिमिटेड, नाशिक 50 पदे, मे. नवभारत फर्टिलायझर लि. 50 पदे, डाटा मॅटिक्स ग्लोबल सर्व्हिसेस लि. नाशिक 17 पदे, यशस्वी ॲकाडमी फॉर स्किल, नाशिक 50 पदे, जी. जे. फूडस, जिन माता फूड प्रोसेसर्स, धुळे 13 पदे, फ्यूजन मायक्रो फायनान्स लि. 50 पदे, धुव्र कोटेक्स प्रा.लि.शिरपूर, स्वातंत्र्य फायनान्स प्रा.लि. 25 पदे, जस्ट डायल 15 पदे, चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रा.लि. 20 पदे, धूत ट्रान्समिशन प्रा.लि. छत्रपती संभाजी नगर 50 पदे, युनिव्हर्सल स्टार्च फिन क्रेडिट प्रा.लि. 10 पदे, गोविंद एच आर सर्व्हिसेस 150 पदे, बीएनसी इक्विपमेंट्स इंडिया प्रा.लि.5 पदे, सुझलॉन एनजी साक्री 50 पदे, सुदर्शन केमिकल्स, अवधान बांभळे प्रा.लि. 10 पदे, डिझान कोटेक्स प्रा.लि. दहिवल शिरपूर 4 पदे, रुब्बी कोटेक्स प्रा.लि.दहिवल शिरपूर 4 पदे, कृष्णा कोटेक्स प्रा.लि.तांडे 4 पदे अशी 1 हजार 20 विविध रिक्तपदे प्राप्त झालेली आहेत. याठिकाणी नोकरी इच्छुक पात्रताधारक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवड करण्यात येणार आहे.

रोजगार इच्छुक उमेदवारांनी किमान पाच प्रतीत बायोडाटासह फोटो आणि आधारकार्ड, सेवायोजन नोंदणी कार्ड, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता इ. कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत सकाळी 10 वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी शिक्षण महर्षी दादासाहेब रावल नॉलेज सिटी, मांडळ रोड, दादा नगर, दोंडाईचा, ता. शिंदखेडा, जि.धुळे येथे उपस्थित रहावे. असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त राजू वाकुडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *