धुळे जिल्हा
जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची नाशिक येथे बदली झाली आहे. त्यांना आज कार्यालयातील सहकाऱ्यांनी निरोप दिला. जिल्हा माहिती अधिकारी म्हणून नाशिक जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती अधिकारी गोपाळ साळुंखे यांनी आज मावळते जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांच्याकडून पदभार स्वीकारला.
श्री. बोडके यांनी २१ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यांची आता नाशिक येथे बदली झाली आहे. तसेच जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांना पत्रकार, छायाचित्रकार बांधवांनी निरोप दिला. यावेळी कार्यालयीन कर्मचारी, पत्रकार, छायाचित्रकार, विविध दैनिकांचे संपादक उपस्थित होते.