जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी साधला महिला शेतकऱ्यांशी संवाद

आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षानिमित्त
धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी साधला महिला शेतकऱ्यांशी संवाद

धुळे जिल्हा

संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. या उपक्रमाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी धुळे तालुक्यातील न्याहळोद येथे महिला शेतकऱ्यांशी संवाद साधला.

कृषी विभागातर्फे महिला शेतकऱ्यांसाठी आयोजित ‘कृषि संवाद’ कार्यक्रमास न्याहळोद गावच्या सरपंच श्रीमती कविता वाघ, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मनोज चौधरी, कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक श्रीमती प्रज्ञा पवार, कृषी उपसंचालक श्रीमती माधुरी गायकवाड, उपसरपंच रमेश चौधरी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच परिसरातील प्रगतशील शेतकरी आणि मोठ्या संख्येने महिला शेतकरी उपस्थित होत्या.

यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शेती आणि महिला सक्षमीकरण हे विकासाचे मुख्य स्तंभ आहेत. ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या थेट गावात जाऊन जाणून घेणे व त्यावर तातडीने उपाययोजना करणे ही प्रशासनाची प्राथमिकता असल्याचे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी त्यांनी महिला शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे महिला शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *