धुळे जिल्हा
धुळे येथील यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळ,धुळे संचलित श्री.संस्कार मतिमंद मुलींच्या बालगृह शाळेच्या विद्यार्थिनींनी आज धुळे तालुका पोलीस ठाण्यात रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला. सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवीत पोलिस अधिकारी आणि कर्मचार्यांनी राख्या बांधून घेतल्या.
यावेळी धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पवार, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड आणि खालीदा सय्यद, एएसआय रवींद्र राजपूत, हेडकॉन्स्टेबल मुकेश पवार,ललित खळगे, नितीन चव्हाण, किशोर खैरनार, समाधान पाटील, दगडू कोळी, संतोष देवरे, मनोज बाविस्कर, सुरेंद्र खांडेकर यांना मतिमंद विद्यार्थ्यांच्या वतीने राख्या बांधून औक्षण करण्यात आले. यावेळी तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांतर्फे गतिमंद मुलींना भेटवस्तू देण्यात आली.
कार्यक्रमास संस्कार मतिमंद संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक सुनील वाघ, कार्यशाळा प्रमुख हीरल वाघ, मुख्याध्यापिका पुनम सूर्यवंशी, शिक्षिका अनघा सूर्यवंशी, अविनाश थोरात आणि मयूर वाघ यांच्यासह शिक्षक कार्यक्रमास उपस्थित होते.