धुळे पोलिसांची कारवाई; सत्तार मेंटल नाशिक जेलमध्ये स्थानबध्द

धुळे जिल्हा

पोलिसांवर हल्ला करण्यासह विविध गंभीर प्रकारच्या गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या धुळ्यातील कुख्यात गुंड सत्तार मेंटल याला नाशिक सेंट्रल जेलमध्ये एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलिसांच्या वतीने देण्यात आली.

पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी आगामी निवडणुक व सण उत्सवाच्या अनुषंगाने सत्तार मासूम पिंजारी उर्फ सत्तार मेंटल (वय ४२) रा.अंबिका नगर, पत्रेवाली मशिद जवळ, धुळे हा समाज विघातक कृत्य करणारा धोकादायक झालेला कुख्यात गुन्हेगार याच्या विरुध्द स्थानबध्दतेची कारवाई करण्यासाठी सन १९८१ मध्ये अस्तित्वात आलेल्या एमपडीए कायद्यानुसार प्रस्तावित करुन मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पोलिस निरीक्षक सुरेश कुमार धुसर यांना दिले होते. त्यानुसार चाळीसगांव रोड पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक धुसर यांनी प्रस्ताव तयार करुन उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे, यांच्या मार्फत पोलिस अधिक्षक यांना सादर केला. त्यानंतर त्याची पडताळणी पो.नि. श्रीराम पवार यंानी केली. तसेच प्रस्ताव मान्य करीत कुख्यात गुंड सत्तार मेंटल याला नाशिक सेंट्रल जेलमध्ये एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले.

सदर कारवाई पेालिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, उपर पोलिस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे, पो नि श्रीराम पवार, पो.नि. सुरेशकुमार धुसर, उप निरी. शरद लेंडे, हे कॉ. संतोष हिरे, हे कॉ. कबीर शेख, हे कॉ. अविनाश वाघ, पो कॉ. हर्षल चौधरी, देवेंद्र तायडे यंानी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *