महायुती सरकारच्या भ्रष्ट मंत्र्यांचे राजीनामे घ्या ; धुळ्यात शिवसेना उबाठातर्फे जनआक्रोश मोर्चा

धुळे जिल्हा

राज्यातील महायुती सरकार मधील भ्रष्टाचारी आणि वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे घेतले जावे, अशी मागणी करीत आज धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोर्चा काढत जनओक्रोश आंदोलन करण्यात आले.

शिवसेना ठाकरे गटाचे धुळे जिल्हा संपर्कप्रमुख तथा उपनेते अशोक धात्रक यांच्या नेतृत्वात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथून या मोर्चाला सुरुवात होऊन या आंदोलनाचे रूपांतर शिवसैनिकांच्या प्रचंड आग्रहामुळे मोर्चात झाले. सदरचा मोर्चा हा नवी महानगरपालिका चौकात निदर्शने केल्यानंतर आग्रा रोड मार्गे, महाराणा प्रताप चौकात पोहोचला. या ठिकाणी संतप्त शिवसेना पदाधिकारी आणि शिवसेनिकांनी भ्रष्टमंत्रांच्या प्रतिमेला शेण चोपडत महिला पदाधिकार्‍यांनी मंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले. या प्रसंगी शिवसेनेच्या वतीने भ्रष्टमंत्रांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

महायुती सरकारमधील महत्त्वाच्या खात्यांमध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद भुषविणारे मुख्यमंत्र्यांचे संकट मोचन गिरीश महाजन यप्रकरणात हनी ट्रॅप प्रकरणात, संजय शिरसाट यांच्या घरात बेडरूम मध्ये पैशाची बॅग असलेला तसेच कृषिमं उच्च उत्तुंग ळ झरे झऑत्री माणिकराव कोकाटे हे विधिमंडळात पत्ते खेळतानां व मंत्री भरत गोगावले यांचा अधोरी पूजा करतानांचे व्हिडिओ व्हायरल झाले तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या डान्सबारचा परवाना असताना त्या ठिकाणी बारबाला नाचविण्यात आल्या या सर्व भ्रष्टमंत्र्यांनी पुरोगामी महाराष्ट्रा च्या विधिमंडळाचे पावित्र्य भंग केले असून या मंत्र्यांची पाठराखण मुख्यमंत्री फडवणीस हे करत असून त्यांनी अशा भ्रष्टमंत्र्यांना ताबडतोब पदावरून हटवावे अशी मागणी यावेळी सेनेच्या पदाधिकार्‍यांनी केली.

मोर्चात जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख धिरज पाटील, माजी महापौर भगवान करनकाळ, शाना सोनवणे, भरत राजपूत आदी सहभागी झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *