कान नदीवर पुलाचे बांधकाम संथ गतीने ठेकेदारास काळ्या यादीत टाका-आ. मंजुळाताई गावित यांची विधानसभेत मागणी

येत्या ३१ जुलै २०२५ अखेर कामे पूर्ण करुन घेण्यात येईल- सार्वजनीक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले

धुळे जिल्हा

साक्री तालुक्यातील कान नदीवर पुलाचे बांधकाम अतिशय संथ गतीने आणि निकृष्ठ पध्दतीने सुरु असल्याची गंभीर तक्रार आमदार सौ. मंजुळाताई गावीत यांनी विधान सभेत करीत संबंधीत ठेकेदारस काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. अडीच ते तीन वर्ष झाले तरी पुलाचे काम पुर्ण झालेले नाही. याकडेही आमदार सौ. गावीत यांनी विधानसभेत लक्ष वेधले.

विधान सभेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. विधानसभेत बोलतांना आमदार सौ. मंजुळाताई गावीत यांनी सांगितले की, साक्री तालुक्यातील (जि.धुळे) रा.मा. ६ ते आमोडे रस्ता इजिमा-२६ या मार्गावरील कान नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्याचे कार्यरंभ आदेश सानिका कंन्स्ट्रक्शन श्री. हितेंद्र जमादार शिरपूर यांना दि. १८.१०.२०२२ मध्ये देण्यात आलेला आहे. अडीच ते तीन वर्षे होऊन गेलेत अद्यापपर्यंत सदर ठेकेदाराने हे काम ५०% टक्के देखील पूर्ण केलेले नाही. काम अतिशय संथ गतीने सुरू असुन कामाचा दर्जा निकृष्ठ आहे. या कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी करून देखील हे काम पूर्ण होत नाही. पुलाचे काम ८० ते ९०% काम पूर्ण झाल्याचे दाखवून या ठेकेदाराने बिले सुध्दा काढून घेतलेली आहे.

अध्यक्ष महोदय आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत नागरिकांना कान नदीतुन जाणे-येणेसाठी अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. या पुलाच्या दोन्ही बाजुच्या ऍप्रोच रस्त्याचे व संरक्षण भिंतीचे बांधकाम व त्यावरील भराव व पुलावरील सरंक्षण कठडे इ. प्रलंबित असलेले कामे संबंधित ठेकेदार मुद्दाम करत नाही. त्यामुळे या पुलाचा वापर करता येत नाही. या परिसरातील ढोलीपाडा, आमोडे, झंजाळे, घोडदे, भोनगाव, दहिवेल, बोधगाव-चिंचपाडा परिसरातील नागरीकांनी ठेकेदाराच्या वेळकाढुपणा मुळे विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरु झालेला असुन कान नदीतुन वाहने नेणे धोकादायक होणार आहे. या ठेकेदारास कार्यालयाने नोटिसा देखील दिलेल्या आहेत. तरीदेखील ठेकेदार काम करीत नाही. सदर ठेकेदाराच्या नावे दुसरीच व्यक्ती काम करीत आहे. असे देखील आमदार मंजुळाताई गावीत यांनी विधानसभेत सांगितले.

तसेच विनाकारण नागरीकांना वेठीस धरणा-या या ठेकेदारास काळ्या यादीत टाकावे व हे काम येत्या ३१ जुलै २०२५ अखेर पुर्ण करुन घ्यावे अशी मागणी केली आहे. याच ठेकेदाराने पुन्हा धनेर-अमळी-सुतारे या गावांना जोडणा-या रस्त्यावर पुलाचे काम देखील घेतलेले आहे. व दोन्ही कामांची प्रगती शुन्य आहे. अशा पध्दतीने साक्री तालुक्यात या ठेकेदाराने अनेक कामे घेतलेली असुन कामे अत्यंत संथ गतीने सुरु आहे. तेव्हा अशा या ठेकेदारास पुन्हा काम करण्याची संधी देऊ नये व त्यास काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे.

यावर सार्वजनीक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी येत्या ३१ जुलै २०२५ अखेर कामे पूर्ण करुन घेण्यात येईल व कामाचा दर्जा राखण्याची पुर्ण जबाबदारी यंत्रणेस सार्वजनिक बांधकाम विभागास जबाबदारी देण्यात येईल असे निर्देश दिले. कामे वेळेत पूर्ण न झाल्यास व कामाचा दर्जा न राखल्यास ठेकेदारावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे मंत्री भोसले यांनी आश्वासीत केले. अशी माहिती आमदार सौ. मंजुळाताई गावीत यांच्या वतीने देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *