धुळे शहर
येथिल प्रदीर्घ अनुभवप्राप्त जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सैनिक डॉ भगवान बोरसे यांच्या संकल्पनेतून देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शाहिदांचे स्मरण करून निसर्गाच्या संवर्धनासह आरोग्य जनजागरण कार्यात जनतेचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष त्रिसूत्री मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी राग फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ गणेश जायस्वाल यांनी जनहितार्थ मोहिमेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
बुधवार दि.२७ ऑगष्ट रोजी असलेल्या श्री गणेश चतुर्थी पासून ते दि. ६ सप्टेंबर रोजी येणाऱ्या अनंत चतुर्दशीपर्यंत सतत दहा दिवस विविध ठिकाणी जनहितार्थ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. गणेशोत्सवानिमित्त आयोजित त्रिसूत्री मोहिमेच्या यशस्वितेसाठी धुळे शहरातील माजी नगरसेवक, राजकीय पदाधिकारी आणी सार्वजनिक गणेश मंडळांचे सहकार्य घेण्यात येत आहे.
वाडीभोकर रोड परिसरातील शासकीय वसाहतीत असलेल्या नवसाचा हनुमान मंदिरात श्री गणपतीची स्थापना करण्यात आली. यावेळी डॉ गणेश जायस्वाल यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियापूर्व मार्गदर्शन करून जनहितार्थ मोहिमेचा शुभारंभ केला. जेष्ठ नागरीक मंडळाचे मार्गदर्शक सेवानिवृत्त प्रा.शरदभाई चौधरी,माजी सैनिक डॉ भगवान बोरसे, प्रा.चंद्रकांत सनेर, सुधाकर पाटील,भालेराव पाटील, भाईदास पटेल, साहेबराव सोनवणे, बी.जी.ठाकूर, राजेंद्र पराशेर, ईश्वर चौधरी, डॉ अहिराराव, योगेश बोरसे, शिवाजी पाटील, अभिमन्यू सिसोदे, निंबा पाटील, नाना पवार,आर.बी. पाटील, सुधाकर वाडेकर, व्ही. जी. पाटील, सूर्यकांत शिंदे, वना पाटील आदी जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
शाहिदांचे स्मरण करून देशप्रेम जोपासण्यासह निसर्गाशी मैत्री करताना आरोग्याची निगा राखणे हि काळाची गरज आहे. जनहितार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी धुळेकरांनी 9373888515 या भ्रमनध्वनीद्वारे संदेस पाठवून त्वरित संपर्क साधावा असे आवाहन माजी सैनिक डॉ भगवान बोरसे, समन्वयक रोहित जायस्वाल, नेत्रतंत्रज्ञ गोविंद भामरे, नरेंद्र बोरसे, प्रफुल कलाल यांनी केले आहे.