जात निहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचे
स्वागत करीत धुळ्यात भाजपतर्फे जल्लोष
धुळे जिल्हा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंनद व्यक्त करीत आज धुळे शहरातील गुरुशिष्य स्मारक चौकत पेढे वाटून, जोरदार घोषणाबाजी करीत जल्लोष करण्यात आला.
यावेळी आमदार अनुप अग्रवाल यंानी कॉंगे्रसवर टिका केली. ते म्हणाले, कॉंग्रेस फुकटचा आव आणून जाती निहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचे फुकटचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. मात्र ज्यांनी सत्तेत राहुन कधीही जात निहाय जनगणना केली नाही, ते कॉंगे्रस नेते आता जनतेची दिशाभुल करीत आहेत. यांचा या निर्णयाशी संबंध नसून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी स्वातंत्र्यानंतर प्रथमच अशा प्रकारे जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेत ऐतिहासिक अशी कामगिरी केली आहे.
यावेळी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर म्हणाले की, कॉंगे्रसने ५ वेळा जनगणना केली मात्र कधीही जाती निहाय जनगणना त्यांनी केली नाही, यापुर्वी ते याचा विरोध करीत होते आता भाजप सरकारने पंतप्रधान मोदी यांनी ऐतिहासिक निर्णय घेत जाती निहाय जनगणना करण्याचे जाहिर केले असतांना कॉंगे्रसचे नेते श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. तसेच हिरामण गवळी यांनी देखील कॉंगे्रसवर जोरदार टिका केली.
यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस डॉ. सुशिल महाजन, माजी महापौर प्रदीप कर्पे, जयश्रीताई अहिरराव, प्रतिभाताई चौधरी, सौ.अल्पाजी अग्रवाल, महिला जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाठ, ओम खंडेलवाल, राजेश पवार, यशवंत येवलेकर, नागसेन बोरसे, विजय पाच्छापुरकर, ऍड.किशोर जाधव, पप्पू ढापसे, कमलाकर पाटील, बबन चौधरी, अनिल दिक्षीत, अमोल मराठे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.