आ. अग्रवाल, आ. भदाणे यांच्या शिफाराशीने बस थांबे मंजूर

आ. अनुप अग्रवाल, आ. राम भदाणे यांच्या शिफाराशीने बस थांबे मंजूर विद्यार्थी-अबाल वृद्धांची होणार सोय

धुळे जिल्हा

धुळे शहरातील ऐंशी फुटी रस्त्यावरील नटराज टॉकीज व जी.टी.पी. स्टॉप देवपुर येथे आ. अनुपभैय्या अग्रवाल यांच्या प्रयत्नाने राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस गाड्यांसाठी विनंती थांबा मंजूर झाला आहे. तसेच धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे यांच्या मागणीनुसार धुळे ते नरडाणा रेल्वे स्टेशन पर्यंत विशेष शटल बस सेवा सुद्धा सुरू करण्यात येणार आहे.
धुळे जिल्हाधिकारी तथा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबधित विभागास दिले आहेत.

यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की  धुळे शहरातील ऐंशी फुटी रस्त्यावर नटराज टॉकीज व जी.टी.पी. देवपूर या दोन ठिकाणी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या सर्व बसेसना विनंती थ़ांबा मंजूर करण्यात आला आहे.

धुळे शहरात ऐंशी फुटी रस्त्यावर नटराज टॉकीज व जी.टी.पी देवपूर ही दोन्ही ठिकाणे अत्यंत वर्दळीचे असून बाहेरगावाहून ये-जा करणार्‍या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहेत. त्यांना ये-जा करण्यासाठी मुख्य बस स्टॉपवर जाणे अत्यंत गैरसोईचे व खर्चीक होते.

या दोन्ही ठिकाणी विनंती बस थांबे निर्माण व्हावेत अशी मागणी नागरिकांनी आ. अनुपभैय्या अग्रवाल यांच्याकडे केली होती. विभाग नियंत्रकांना पत्र देवून हे थांबे मंजूर करावेत असे आ. अग्रवाल यांनी संबंधितांना सुचविले आणि ऐंशी फुटी स्त्यावर नटराज टॉकीज व जी.टी.पी. देवपूर येथे विनंती बसथांबे निर्माण करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले.

यामुळे चंद्रशेखर आझाद नगर भागातील साईश्र्दा मित्र मंडळ व विविध कॉलनीतील युवक योगेशभैय्या चौधरी, विनोद दांडगे, कमलेश लोंढे, सचिन मराठे, विक्की मराठे, देविदास मराठे, राहुल सोनार, मयूर मराठे, धनंजय चौधरी, प्रकाश चौधरी, निरज परदेशी, भोलाभाऊ सगरे, तेजस पाटील, प्रतिक चव्हाण, रमेश पाटील सर, योगेश जोशी सर, दादाभाऊ वाणी इत्यादींनी आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांचे आभार व्यक्त केले आहेत.

आ.राम भदाणे यांच्या सूचने वरून
धुळे ते नरडाणा रेल्वेस्टेशन शटल बससेवा

धुळे तालूक्यातील सोनगीर, सरवड, कापडणे, देवभाणे, नगाव व परिसरातील ग्रामस्थ प्रवाशांसाठी नरडाणा रेल्वे कनेक्शन बससेवा सुरू करण्यात यावी अशा आशयाचे  पत्र आमदार राम भदाणे यांनी १६ एप्रिल ला धुळे बस आगाराला दिले होते. ग्रामस्थांच्या मागणी वरून आमदार भदाणे यांनी लेखी पत्र दिले होते की, नरडाणा रेल्वेस्थानकावरुन गुजरात राज्यात कामानिमीत जाणारे धुळे ग्रामीण मतदार संघातील हजारो प्रवाशी प्रवास करीत असतात. या अगोदर धुळे बसस्थानकावरुन नरडाणा रेल्वेस्थानकापर्यंत बससेवा सुरु होती. परंतू स्द्या सदर बससेवा सुरु नसल्याने प्रवशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे धुळे तालुक्यातील सोनगीर, सरवड, कापडणे, देवभाने, नगांव सोबत परिसरातील ग्रामस्थांसाठी नरडाणा रेल्वे कनेक्शन बस सुरु करण्यात यावे.या पत्राची दखल घेत त्यानुसार धुळे व शिरपूर आगारातर्फे नरडाणा रेल्वे कनेक्शन बससेवेची नियते मंजुर करण्यात आली आहेत. त्यानुसार सदर नियत फे-या नियमीत व नियोजीत वेळी चालविणे बाबत आगार व्यवस्थापक रा.प. धुळे व शिरपूर यांना आदेशित करण्यात आले आहे. बस सेवा धुळे आगार कडून धुळे ते शिरपूर शटल १६:०० व १९:३० वा. (व्हाया नरडाणा रेल्वे स्टेशन ) तसेच शिरपूर ते धुळे १७:४५ वाजता असेल, शिरपूर ते नरडाणा रेल्वे स्टेशन २१:१५ वा. असणार आहे. रेल्वे स्टेशन ते धुळे २२:०० व ४:४५ असणार आहे. ग्रामस्थांच्या सोयी साठी बस सेवा सुरु होणार आहे. ग्रामस्थांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन आ. राम भदाणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *