धुळे शहर
शहरातील मिल परिसरातील युवा,कल्पक, माजी नगरसेवक तथा पश्चिम मंडल भाजपाचे अध्यक्ष, जनसेवक बंटी मासुळे यांचे चितोड रोडवरील क्रांती चौकात जनतेसाठी संपर्क कार्यालय सुरु केले जात आहे. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर धुळ्याचे आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांच्या शुभहस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येत आहे. रविवार, दि. ७ जुलै रोजी सकाळी १० वाजता चितोड रोड, क्रांती चौक येथे हा कार्यक्रम होणार आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री ना.जयकुमार रावल, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, महामंत्री विजय चौधरी, धुळ्याचे आ.अनुप अग्रवाल, आ.अमरिशभाई पटेल, माजी आ.राजवर्धन कदमबांडे, भाजप जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, द्वारकाधिश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष परमगोभक्त रविंद्रबापूजी शेलार यांच्या मार्गदर्शनानुसार जनतेच्या सोयीसाठी मिल परिसरातील चितोड रोडवरील क्रांती चौकात जनसंपर्क कार्यालय रविवारपासून जनतेसाठी खुले होत आहे.
बंटी मासुळे हे गेल्या दहा वर्षांपासून मिल परिसराचे महापालिकेत प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांनी पदाचा उपयोग करत मिल परिसरासह संपूर्ण प्रभागात भव्य दिव्य अशी विकासकामे केली. कल्पक, धडपड्या असलेल्या या युवा कार्यकर्त्याने प्रभागात विकासकामांसोबतच तरुणाईला दिशा देण्याचेही काम केले. बंटी मासुळे हे जनतेसाठी २४ तास उपलब्ध असणारे जनसेवक म्हणून ओळखले जातात. बंटी मासुळे हे चालते फिरते जनसंपर्क कार्यालयचं आहे. मासुळेंच्या विकासकामांची, पक्षनिष्ठा आणि पक्षवाढीसाठी करत असलेल्या प्रयत्नांची दखल घेवून दीड वर्षांपूर्वी पक्ष संघटनमध्ये मंडल अधिकारी,पदाधिकारीची जबाबदारी दिली. आता पूर्वीचा साक्रीरोड आणि मिल परिसर यांचे एकत्र मंडल करुन पश्चिम मंंडलची निर्मिती करण्यात आली. त्याची जबाबदारी देखील बंटी मासुळेंवर पक्षाने सोपविली होती. ६१ बुथ , प्रमुख पदाधिकारी यांच्याशी संपर्क व्हावा,त्यांच्या बैठकांसाठी हक्काची जागा असावी म्हणून या जनसंपर्क कार्यालयाचा उपयोग केला जाणार आहे.
त्याबरोबरच मिल परिसरातील कष्टकरी जनतेला शासकीय योजनांच्या लाभासाठी फॉर्म भरण्यापासून ते मंजुरीपर्यंत शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात. त्यांची ससेहोलपट थांबविण्यासाठी देखील या जनसंपर्क कार्यालयाचा उपयोग होणार आहे. शासकीय योजनांची माहिती, मदत, विद्यार्थी मित्रांना, शाळा महाविद्यालयातील अडचणीसंदर्भातील मार्गदर्शन देखील याच संपर्क कार्यालयातून केले जाईल. प्रभागातील जनतेच्या मुलभूत सुविधांमध्ये अडथळा आला असेल तर ते सोडविण्यासाठी जनतेचे हक्काचे ठिकाण म्हणून हे संपर्क कार्यालय असेल प्रभागातील पथदिव्यांची व्यवस्था, गटारी, घंटागाडी, नाले सफाई, झाडं झुडपं काढणे अशा समस्यांचा निपटारा या जनसंपर्क कार्यालयातून केला जाईल.
मिलपरिसरातील तमाम बंधू भगिनी आणि माय मावल्यांसह सर्व जेष्ठ श्रेष्ठ नागरीकांच्या तसेच विद्यार्थी आणि तरुणंाना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासह त्यांच्या प्रभागातील समस्या, शासकीय अडी अडचणी सोडवण्यासाठी हक्काचे ठिकाण म्हणून क्रांती चौक, चितोड रोड येथे भारतीय जनता पक्ष पश्चिम मंडल जनसंपर्क कार्याल सुरु करीत आहे. आषाढीच्या एकादशीच्या मुहूर्तावर रविवार दि. ७ जुलै रोजी सकाळी १० वाजता या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आ.अनुपभैय्या अग्रवाल यांच्या हस्ते होणार असून महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ अंपळकर आणि पक्षाचे वरीष्ठ नेते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार्या या कार्यक्रमाला मिलपरिसरातील तसेच पश्चिम मंडलातील सर्व नागरीकांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन जनसेवक बंटी मासुळेंनी केले आहे.