धुळ्यात सर्व 30 केंद्रांवर तरुणाईसह प्रौढ महिला-पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
धुळे शहर
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतील एबी फाउंडेशन व भारतीय जनता पक्षातर्फे शहरातील विविध भागांतील 30 ठिकाणी आज महारक्तदान शिबिराचा उपक्रम झाला. रक्तदानाच्या या महायज्ञाचा कुंभ काठोकाठ भरला. शहरातील विविध भागांतील तरुणाईसह प्रौढ महिला-पुरुषांनी सहभागी होत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील सर्वच केंद्रांवर युवक-युवती-महिला-पुरुष दात्यांच्या रक्तदानासाठी अक्षरशः रांगा लागल्याचे चित्र होते. यात आज सायंकाळपर्यंत तब्बल 4150 बाटल्या रक्तसंकलन झाले.
दरम्यान, शहरातील चाळीसगाव रोडवरील मारुतीनगरमधील भाजपच्या नूतन कार्यालयात झालेल्या शिबिरात 25 ते 30 तृतीयपंथीयांनीही सहभागी होत रक्तदान केले. राज्याचे लाडके मुख्यमंत्री व आमचे लाडके देवाभाऊ यांना वाढदिवसाच्या आमच्याकडून या अनोख्या शुभेच्छा असल्याची भावना तृतीयपंथीयांनी व्यक्त केली. आमदार अनुप अग्रवाल यांच्या पत्नी तथा भाजपच्या बेटी बचाव-बेटी पढावच्या संयोजिका अल्पा अग्रवाल यांनीही शहरातील अग्रसेन चौकातील केंद्रावर जाऊन रक्तदान केले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचा उपक्रम झाला. धुळे शहरातही जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री जयकुमार रावल, भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, माजी मंत्री डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरिशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अनुप अग्रवाल, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या नेतृत्वात आमदार अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयासह शहरातील विविध भागांतील 30 ठिकाणी महारक्तदान शिबिराचा उपक्रम झाला. या सर्व 30 ठिकाणी झालेल्या शिबिराची भाजपच्या विविध आघाड्यांच्या प्रमुख 30 पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली होती. यात केंद्रनिहाय रक्तसंकलन बाटल्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. सर्वच केंद्रांवर उद्दिष्टापेक्षा जास्त बाटल्या रक्तसंकलन करून धुळेकरांनी सक्रिय सहभागातून हा उपक्रम यशस्वी केला.
मालेगाव रोडवरील आमदार कार्यालय व आग्रा रोडवरील खंडेराव मंदिर परिसरात एबी फाउंडेशन, कामगार आघाडीतर्फे झालेल्या शिबिराचे उद्घाटन माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, बेटी बचाव अभियानाच्या प्रदेश संयोजिका अल्पा अग्रवाल यांच्या हस्ते झाले. यावेळी विजय पाच्छापूरकर, मनोज गर्दे, महादेव परदेशी, मायादेवी परदेशी, शशी मोगलाईकर, अजय अग्रवाल, संयोजक आकाश साखला, कमलेश देवरे, भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विजय पवार, विकी परदेशी, धीरज परदेशी, ॲड. रोहित चांदोडे, अमोल सूर्यवंशी, ॲड. किशोर जाधव, दिनेश बागूल, सुनीता सोनार, देवा मिस्तरी, कैलास कासार, सागर कोडगे, करण चांगरे, अंकुश बडगुजर, प्रीती चव्हाण, माधुरी भावसार, अमित भोसले, स्वामी कुटे, किरण अहिरे, मोहन टाकले, संतोष परदेशी, जयेश वावदे, भटू गवते, सागर जोशी, सुमित माईनकर आदी उपस्थित होते. दरम्यान, अन्य सर्व केंद्रांवर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिबिराचे उद्घाटन केले.
रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान असल्याचे मानत शहरातील 30 केंद्रांवर झालेल्या या शिबिरात शहरातील युवक-युवती, महिला-पुरुषांनी तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी रक्तदानात सक्रिय सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्तदान करणाऱ्या दात्यांना भेटवस्तू म्हणून पाण्याचा जार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, प्रदेश सरचिटणीस डॉ. सुशील महाजन, जितेंद्र शहा, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, माजी महापौर प्रतिभा चौधरी, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, ओमप्रकाश खंडेलवाल, स्थायी समितीचे माजी सभापती शीतलकुमार नवले, यशवंत येवलेकर, वैशाली शिरसाट, आकाश परदेशी, अमोल मासुळे, प्रथमेश गांधी, पंकज धात्रक, ज्ञानेश्वर पाटील, विजय पवार, कमलाकर पाटील, पृथ्वीराज पाटील, राम अग्रवाल, भागवत चितळकर, माजी नगरसेविका सुरेखा उगले, मोहिनी गौड, पवन जाजू, अमोल मराठे, वंदना भामरे, मोहित देसले, ईश्वर पाटील, हिरालाल मोरे, सुहास अंपळकर, मनीषा ठाकूर, राकेश कुलेवार, भगवान देवरे, शिवाजी साळुंखे, अभिजित सूर्यवंशी, निलेश राजपूत, छोटू थोरात, योगेश भोकरे, किशोर चौधरी, ललित आरुजा, तुषार भागवत, प्रशांत नवले, चेतन गवळी, सिद्धांत मंगळे, विजय देवरे, रजनीश निंबाळकर, प्रशांत बागूल, दीपक कोळी, निनाद पाटील यांच्यासह भाजपचे सर्व माजी नगरसेवक, पक्षाचे विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संयोजन केले.
तृतीयपंथीयांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
या महारक्तदान शिबिराच्या माध्यमातून शहरातून सुमारे चार हजार बाटल्या रक्तसंकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. सायंकाळी उशिरापर्यंत शहरातील सर्व 30 केंद्रांवर सुमारे 4150 धुळेकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून रक्तदानासारख्या श्रेष्ठ कर्तव्यात योगदान दिले. सर्वच केंद्रांवर रक्तदानासाठी सकाळपासून युवक-युवतींसह नागरिकांची गर्दी होती. यामध्ये तृतीयपंथीयांनीही सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला. शहरातील चाळीसगाव रोडवरील मारुतीनगरमधील भाजप कार्यालयात झालेल्या शिबिरात प्रेरणा बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पार्वती जोगी, निलू जोगी, स्वरा जोगी, अलका जोगी, किरण जोगी, शुभांगी जोगी, विशाखा जोगी, राधा जोगी, मुस्कान जोगी, मैना जोगी यांच्यासह २५ ते ३० तृतीयपंथीयांनी रक्तदान करत राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या.
आमदार कार्यालयात रक्त तपासणी
दरम्यान रक्तदान शिबिरात आमदार अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयात एबी फाउंडेशन व कामगार मोर्चातर्फे कामगारांसह रक्तदात्यांची विविध 36 प्रकारची रक्त तपासणी करण्यात आली. तपासणी झालेल्या सर्व दात्यांना तपासणीचे रिपोर्ट देण्यात आले.
55 किलोंचा केक कापून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस
शहरातील गल्ली क्रमांक पाचमधील मनपाच्या शाळा क्रमांक 9 जवळील हिंदू एकता चौकात शिबिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, अल्पा अग्रवाल, महादेव परदेशी, मायादेवी परदेशी, गजेंद्र अंपळकर यांच्या हस्ते 55 किलोंचा केक कापण्यात आला. विकी परदेशी, चेतन मंडोरे, तुषार भागवत यांनी संयोजन केले.
या केंद्रांवर झाले रक्तसंकलन
1) अग्रसेन चौक 2) अभय महाविद्यालय 3) दत्तमंदिर चौक 4) छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पारोळा रोड 5) जिल्हा क्रीडा संकुल चौक 6) त्रिकोणी गार्डन (प्रभाग 11) 7) पंचवटी चौक, देवपूर 8) नगावबारी चौफुली 9) क्रांती चौक 10) मारुतीनगर, चाळीसगाव चौफुली 11) वीर शिरोमणी महाराणा प्रताप चौक 12) शनीनगर चौक 13) संत गाडगेबाबा भुवन (मोगलाई) 14) मारुती मंदिर (वर्षावाडी), मोहाडी 15) मतिमंद शाळा, मोराणे 16) कुंभार खुंट, जुने धुळे 17) विघ्नहर्ता गणपती मंदिर, इंदिरा गार्डन 18) प्रसन्न हनुमान मंदिर (प्रभाग 11) 19) आमदार अनुप अग्रवाल जनसंपर्क कार्यालय, 20) खंडेराव मंदिर, आग्रा रोड 21) अयोध्यानगर, साक्री रोड 22) नेहरू चौक 23) बहावलपुरी पंचायत, साक्री रोड 24) जलारामबाप्पा मंदिर (नटराज चित्रपटगृह) 25) मनपा शाळा क्र. 9, हिंदू एकता चौक 26) स्वराज जिम, मिल परिसर 27) मरिमाता चौक, गल्ली क्र. 4 28) सरकारी आपला दवाखाना, वलवाडी 29) विठ्ठल-रखुमाई मंदिर, वाखारकरनगर 30) डॉ. शकील देशमुख क्लिनिक, खेमजी अजबेनगर, साक्री रोड