धुळे जिल्हा
धुळे शहर आणि परिसरात आज दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. अचानक आलेल्या वादळाने धुळ्यात काही ठिकाणी झाडे पडली आहे. तर लोकांची तारांबळ उडाली.
धुळे तालुक्यातील अनेक गावात सुद्धा वादळ आणि अवकाळी पावसाने तडाखा दिला आहे. आज मंगळवारी दुपारी चार वाजेच्या नंतर अचानक वादळाला सुरुवात झाली धुळीचे लोट उडून सगळीकडे नागरिकांची धावपळ उडाली वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसालाही सुरुवात झाली या अचानक आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी झाडे झाडांच्या फांद्या उदमळून पडल्या तसेच बाजारपेठ परिसरातही चांगलाच गोंधळ उडाला अचानक आलेल्या पावसामुळे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.