धुळे जिल्हा
लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्यावर आता गाव खेड्यांमध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. धुळे तालुक्यातील विविध गावांमध्ये येत्या २०२५ ते २०२३ या पंचवार्षिक निवडणुकांसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडत आज दि. ७ एप्रिल रोजी धुळे तहसिलदार कार्यालयात काढण्यात आली. यावेळी गावचा सरपंच होण्याचा मनसुबा बाळगून असणार्यांनी मोठी गर्दी केलेली पहायला मिळाली.
धुळे तालुक्यातील अनुसुचीत क्षेत्रातील ग्रामपंचायती वगळून इतर सर्व ग्रामपंचायती करीता सन २०२५-२०३० या कालावधीसाठी ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी आज सोमवार, ७ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता तहसिल कार्यालय, धुळे ग्रामिण येथे आरक्षण सोडत काढण्यात आली. तहसिलदार (ग्रामिण) अरुण शेवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी विविध गावांमधील आजी माजी सरपंच आणि राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात अनुसूचित जाती अर्थात एस.सी. प्रवर्ग सरपंच पदाचे आरक्षण – जापी, नंदाळे बु., बोरविहीर, मोरदड, गरताड, खंडलाय खु, व लोणखेडी या गावांसाठी काढण्यात आले.
अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्ग सरपंच पदाचे आरक्षण – गोताणे, सौंदाणे, देऊर खु, बेहेड, हडसुणी, आंबोडे, सिताणे, फागणे, मळाणे, धनुर/लोणकुटे, बोरकुंड, धामणगांव, मोरदड तांडा, पिंपरखेडे, सावळदे, अजनाळे, आमदड-वजीरखेडे, निमखेडी, कौठह, तिखी, लळींग/दिवाणमळा. या गावांसाठी काढण्यात आले.
नागरीकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)सरपंच पदाचे आरक्षण – धाडरा, धाडरी, नाणे, निमगुळ, लामकानी, शिरडाणे प्र.डा., बाबरे, देवभाने, उभंड, कुळथे, जुनवणे, दह्याणे, दापूरा/दापूरी, निमडाळे, निकुंभे, बोदगाव/वणी खु., मुकटी, मोराणे प्र.नेर, मोघण, वडगावख सरवड, कापडणे, खंडलाय बु, चौगाव/हिंगणे, तरवाडे, बाभुळवाडी, भिरडाणे/भिरडाई, मेहरेगाव, रामी, लोहगड, शिरुड, शिरडाणे प्र.नेर, सावळी/सावळीतांडा, सैताळे, सोनगीर, विंचूर या गावांसाठी काढण्यात आले.
सर्वसाधारण प्रवर्ग (ओपन) सरपंच पदाचे आरक्षण – अनकवाडी, आर्वी, काळखेडे, कुंडाणे (वरखेडे), कुसूंबा, जुन्नेर, अंचाळै तांडा, रानमळा, वडणे, सातरणे, हेंद्रुण, नवलनगर, गावरी, अजंग/कासविहीर, अंचाळे, अकलाड, आर्णी, इसरणे, उडाणे, कावठी, कावठी, कुंडाणे (वार), कुंडाणे (वेल्हाणे), खेडे/सुदे्रपाडा, खोरदड, बांगुर्ले प्र.नेर, गोंदूर, चिंचखेडे, चिंचवार, चांदे, देऊर बु., दोंडवाड, धमाणे/धमाणी/चौडी, नरव्हाळ, नगाव/तिसगाव/ढंढाणे, नवलाणे, नावरा, न्याहळोद, नेर/म.पांढरी वैगरे, नंदाळे खु, नांदे्र/ पुनितपाडा, नंदाणे, पाडळदे, पुरमेपाडा, बल्हाणे, बिलाडी, बोरसुले/नवेकाठारे, बेंद्रेपाडा, बोरीस, होरपाडा, रतनपुरा, भदाणे, मोहाडी प्र.डा., मोरशेवडी, मांडळ, रावेर, वडजाई, वणी बु., वार, विश्वनाथ/सुकवड, वेल्हाणे बु., सडगाव/हेंकळवाडी, सायने, सांजोरी, सोनवाडी, हेंकळवाडी/तामसवाडी, तांडा.कुंडाणे. या गावांसाठी काढण्यात आले. अशी माहिती तहसिलदार (ग्रामिण) अरुण शेवाळे यांनी दिली आहे.