अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही बनली  खपराच्या पुरणपोळीची ‘फॅन’… गावच्या विकासाचे केले तोंडभरून कौतुक !

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही बनली  खपराच्या पुरणपोळीची ‘फॅन’… गावच्या विकासाचे केले तोंडभरून कौतुक !

मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानात सहभागी होण्याचे केले आवाहन

धुळे जिल्हा

धुळे जिल्ह्यातील खलाणे गावातील विकासकामे पाहण्यासाठी आलेल्या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी आज खानदेशाची फेवरेट खापराची पुरणपोळी चाखली आणि या अस्सल गावरान चवीने अप्सरा आली म्हणत लोकांना ‘फॅन’ बनवणारी सोनाली कुलकर्णी ही खापराच्या पोळीची फॅन बनली.

लोकसहभागातून एकत्र काम केल्याचा हा सकारात्मक परिणाम आहे. लोकसहभाग ही सर्वात मोठी शक्ती आहे. गावाचे लोक जेव्हा एकत्र येतात, तेव्हा खऱ्या अर्थाने गावाचा विकास होतो, अशा शब्दात सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी आज धुळे जिल्ह्यातील खलाणे ग्रामस्थांचे कौतुक केले.

मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानांतर्गत धुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत विविध विकास कामे सुरू आहेत. या अभियानाला अधिक बळ मिळावे, ग्रामपंचायतमध्ये राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण कामांना प्रोत्साहन मिळावे, तसेच लोकसहभाग वाढावा या उद्देशाने प्रख्यात मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आज सकाळी खलाणे गावात आल्या होत्या.


याप्रसंगी धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजीज शेख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
राजेश इंगळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत स्नेहा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजय पडोळ, गटविकास अधिकारी रमेश नेतनराव, धुळे गटविकास अधिकारी गणेश चौधरी, माजी जि.प. सदस्य पंकज कदम, विजय टाटिया, विस्ताराधिकारी कपिल वाघ, सरपंच रत्नाबाई शामू भील, उपसरपंच पुनमबाई प्रवीण भदाणे यांच्यासह तालुक्यातील आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी सभापती, सरपंच यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरवातीला वीर शहीद योगेश भदाणे यांना मानवंदना देण्यात आली. तसेच वीर शहीद योगेश भदाणेचे जिमचे उद्घाटन करण्यात आले. बचत गटामार्फत निरनिराळ्या स्टॉलच्या प्रदर्शनाचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. यावेळी सोनाली कुलकर्णी यांनी गावात पाहणी करुन ग्रामस्थांशी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *