कॉंगे्रसच्या शेकडो पदाधिकार्यांसह शिवसेना उबाठाचे ही पदाधिकारी भाजपात
मुंबई
भाजपाच्या मातब्बर नेत्यांच्या उपस्थितीत धुळे जिल्हयाचे नेते आणि कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश कार्ययाध्यक्ष माजी आ.कुणाल पाटील यांचा आज मंगळवार दि.१ जुलै रोजी मुंबईत एका दिमाखदार सोहळ्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला. भाजप नेतृत्वाने कुुुणाल पाटील यांचे जंगी स्वागत केले. या प्रवेश सोहळ्याची आज राज्ययभर चर्चा झाली. कॉग्रेसला तर मोठा धक्का बसला.
माजी आमदार कुणाल पाटील यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याला नूतन प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण, मावळते प्रदेशाध्यक्ष महसुल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे, ना. गिरीश महाजन, पालकमंत्री ना. जयकुमार रावल, मंत्री जयकुमार गोरे, आमदार स्मिता वाघ, आ. मंगेश चव्हाण,आ. अनुप अग्रवाल, आ.राम भदाणे, महामंत्री विजय चौधरी, भाजपाचे धुळे जिल्हाध्यक्ष बापू खलाणे, भाजपा शहराध्यक्ष गजेंद्र अंपाळकर, माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, आजी जि प सभापती हर्षवर्धन दहीते, संग्राम पाटील, डॉ.सुशील महाजन, माजी जि. प.अध्यक्ष भरती देवरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते हिरामण गवळी, माजी महापौर प्रदीप करपे, पुणे नगरसेवक देविदास पाटील, माजी महापौर जयश्री अहिरराव, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी जि. प.सदस्य अरविंद जाधव, जी प. सदस्य संग्राम पाटील आदी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसापासून धुळे ग्रामीणचे माजी आमदार आणि महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाच्या चर्चा सुरु होत्या. आज अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून माजी आ.कुणाल पाटील यांनी मुंबईतील भाजपाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या एका दिमाखदार प्रवेश सोहळ्यात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
कॉंग्रेसचे माजी खासदार व स्वातंत्र्य सैनिक कै.चुडामण आनंदा पाटील आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री स्व.दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या तिसर्या पिढीचे वारसदार म्हणून माजी आ.कुणाल पाटील यांच्याकडे राजकारणातील प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून पाहिले जाते. आपल्या विधानसभेतील आमदारकीच्या दोन टर्ममध्ये धुळे ग्रामीण मतदारसंघसह जिल्ह्यातील विविध समस्यांवर आवाज उठवत शेतकर्यांसह सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले होते. विधानसभेतील अभ्यास, नियमित कामकाजातील सहभाग, आणि प्रभावीपणे केलेली भाषणे यामुळे माजी आमदार कुणाल पाटील यांना राष्ट्रकुल मंडळातर्फे उत्कृष्ट भाषणाचा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. माजी आ.कुणाल पाटील हे सन २०१४ आणि २०१९ मध्ये विधानसभेत धुळे ग्रामीण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. तर २०१९ मध्ये झालेल्या धुळे लोकसभा निवडणूकीत कॉंग्रेसतर्फे धुळे लोकसभा मतदासंघाची निवडणूक लढविली होती. दरम्यान ते महाराष्ट्र कॉंग्रेसचे विद्यमान कार्याध्यक्ष होते. कॉंग्रेस पक्षात त्यांची एनएसयुआय,युवक कॉंग्रेस,कॉंग्रेस पक्षात सक्रीयपणे काम करीत जिल्हयातील युवकांचे मोठ्या प्रमाणात संघटन उभे केले होते. त्यामुळे युवकांमध्ये लोकप्रिय चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. दरम्यान धुळे मतदारसंघात दांडगा जनसंपर्क, तालुक्यात राबविलेली सिंचन चळवळ, गावागावात केलेली विकासाची कामे यामुळे जिल्हयातील राजकारणात माजी आ.कुणाल पाटील यांचा प्रचंड दबदबा आहे. त्यामुळे मा.आ.कुणाल पाटील यांच्या प्रवेशाने धुळे जिल्हयातील भाजपाची मोठी ताकद वाढली असून भाजपाला जिल्हयातील पहिल्या फळीसाठी महाब्रँड नेता मिळाला आहे.
*मंत्रालय परिसर दुमदुमला*
मुंबईतील मंत्रालय परिसरातील भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या माजी आमदार कुणाल पाटील यांचा प्रवेश सोहळा लक्षवेधी ठरला. पक्ष कार्यालयाचा परिसर घोषणांनी दणाणून सोडला होता. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरामध्ये कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता. त्यामुळे माझी आमदार कुणाल पाटील यांचा पक्षप्रवेश हा न भूतो न भविष्यती ठरला.
*शेकडो वाहने, हजारो कार्यकर्ते दाखल*
१ जुलै रोजी मुंबईत झालेल्या मा. आ. कुणाल पाटील यांच्या भाजप पक्ष प्रवेश सोहळ्याला धुळे ग्रामीण मतदार संघासह धुळे जिल्ह्यातून शेकडो वाहनातून हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले होते. गावागावातून स्वयंस्फूर्तीने व स्वखर्चाने तब्बल ६०० पेक्षाही अधिक वाहने प्रवेश सोहळ्यासाठी आली होती. धुळ्यापासून थेट नाशिक, मुंबईपर्यंत महामार्गावर माजी आमदार कुणाल पाटील यांच्या प्रवेशासाठी जाणार्या वाहनांचा ताफा लक्ष वेधून घेत होता.
*मुंबईत बॅनर झळकले*
महाराष्ट्र कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष मा.आ. कुणाल पाटील यांचा आज भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला. त्या अनुषंगाने मुंबई प्रदेश कार्यालय मंत्रालय परिसरात माजी आमदार कुणाल पाटील यांच्या समर्थकांनी बॅनर झळकविले होते. मुंबईतील नरिमन पॉईंट, मरीन ड्राईव्ह, मंत्रालय परिसर, विधान भवन परिसर, भाजप प्रदेश कार्यालय परिसरात कार्यकर्त्यांनी लावलेले बॅनर झळकल्याने आणि धुळे जिल्ह्यातून हजारो कार्यकर्तेची उपस्थिती दिसल्याने संपूर्ण परिसर भाजपमय झाला होता.
भाजपात या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा झाला प्रवेश
मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात माजी आमदार कुणाल पाटील यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी धुळे तालुक्यात जिल्ह्यातील मातब्बर पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. धुळे तालुका पंचायत समिती शिवसेनेचे माजी सभापती कैलास पाटील, शिवसेनेचे विलास अण्णा चौधरी, धुळे शहर शिवसेनेचे ललित माळी, बाजार समितीचे सभापती साहेबराव खैरनार, माजी सभापती बाजीराव पाटील, उपसभापती एन. डी. पाटील, माजी उपसभापती योगेश पाटील, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, ज्येष्ठ नेते प्रमोद भाऊ जैन, धुळे तालुका कॉंग्रेस अध्यक्ष भगवान पाटील, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र शिंदे,विजय चिंचोले, बाजार समितीचे संचालक विशाल सैंदाणे, पंढरीनाथ पाटील, माजी जि. प. सदस्य अरुण पाटील, डॉक्टर एस टी पाटील, युवा नेते रायबा पाटील,माजी नगरसेवक सदाशिव पवार संजय चोरडिया, शिवसेनेचे हरीश माळी, माजी नगरसेवक सादिक शेख, जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश गर्दे, माजी अध्यक्ष हर्षल साळुंखे, प्रदेश सचिव युवक कॉंग्रेसचे राजीव पाटील, युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष हरीश पाटील, ज्येष्ठ नेते डॉक्टर दत्ता परदेशी, माजी सभापती गुलाबराव पाटील, तालुका कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष शिवदास माळी माजी पंचायत समितीचे उपसभापती देवीदास माळी, पंचायत समिती माजी पंचायत समिती सदस्य भगवान चौधरी, माजी प. स.सदस्य अविनाश महाजन, संचालक रावसाहेब पाटील, ऋषिकेश ठाकरे, जि. प.सदस्य आनंद पाटील,ङ्धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजी-माजी सभापती उपसभापती सर्व संचालक मंडळ, खरेदी विक्री संघाचे आजी-माजी चेअरमन व्हायचेरमन सर्व संचालक मंडळ, दूध संघाचे आजी-माजी चेअरमन व्हा. चेअरमन सर्व संचालक मंडळ, जवाहर सूतगिरणीचे पदाधिकारी, धुळे तालुका व जिल्हा कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, महिला कॉंग्रेसचे पदाधिकारी, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी, तसेच धुळे तालुक्यातील कॉंग्रेसचे जि.प. व प.स.सदस्य, धुळे तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतचे सरपंच, सेवा सोसायटीचे चेअरमन, संचालक मंडळ ग्रामपंचायत सदस्य, यांच्यासह धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील आमदार कुणाल पाटील यांना मानणारे असंख्य मातब्बर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.