हद्दवाढ गावातील समस्यांवर आ.राम भदाणे यांच्या धुळे मनपा प्रशासनाला सूचना

हद्दवाढ गावातील नागरिकांच्या तक्रारींकडे लक्ष द्या
आ. राम भदाणे यांच्या धुळे मनपा अधिकार्‍यांना सूचना

धुळे जिल्हा

धुळे महापालिका हद्दीतील ११ गावांच्या समस्या वाढल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. तक्रारी करूनही धुळे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी लक्ष देत नाही. नागरिकांच्या समस्या तात्काळ निकाली काढा अश्या सूचना धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र पाटील उर्फ राम भदाणे यांनी आयोजित आज महापालिकेत आढावा बैठकीत अधिकार्‍यांना दिल्या.
धुळे महापालिकेत समावेश झालेल्या हद्दवाढ ११ गावांतील नागरिकांना मूलभूत समस्यांना समोरे जावे लागत आहे. वेळेवर घंटागाड्या येत नाहीत, पाणीपुरवठ्याचे गळती अधिक असल्याने पाणीपुरवठा वेळेत होत नाही, एलईडी लाईट ना दुरुस्त आहेत, आरोग्य, आवास योजने मध्ये अनेक लाभार्थी वंचित आहेत या विषयी नागरिकांनी आमदार राम भदाणे यांच्या कडे तक्रार केल्या होत्या .नागरिकांच्या समस्या लक्षात घेता नुकतीच मनपा अधिकार्‍यांसोबत महापालिकेच्या आयुक्त यांच्या दालनात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार भदाणे यांनी मनपाने पाच वर्षात कोणत्या नागरीसुविधा दिल्या तथा अधिकार्‍यांनी आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा जाणून घेतला. नागरिकांच्या तक्रारी वाढल्यामुळे मनपाच्या कारभाराविषयी आ. भदाणे यांनी नाराजी व्यक्त केली. मनपा हद्दवाढ गावातील नागरिकांच्या तक्रारी कडे लक्ष घाला अशी सूचनाही यावेळी मनपा अधिकार्‍यांना देण्यात आल्या.
यावेळी महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे , अतिरिक्त आयुक्त करूणा डहाळे, उपायुक्त शोभा बाविस्कर, विभाग प्रमुखासह हद्दवाढीतील माजी नगरसेवक नरेश चौधरी, रावसाहेब नांद्रे, राजेश पवार, रंगा ठाकरे, नवनाथ पवार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *