**धुळे ब्रेकिंग
धुळे तालुक्यातील आनंद खेडा गावातील शेतकऱ्यांच्या गोठ्याला मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत शेतकऱ्यांच्या 7 म्हशीचे पारड्यांचा मृत्यू झाला आहे.
तसेच 10 म्हशी आगीत होरपळून गेल्याने म्हशींचे डोळे आणि अंगावरची त्वचा जळून जबर दुखापत झाली आहे. गोठ्यामध्ये ठेवलेलं मका गहू आणि शेती साहित्य सुध्दा जळून खाक झाल्याने पितांबर फकीरा भामरे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.
E
मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे 50 ते 60 लाखाचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. दरम्यान ही भीषण आग कशामुळे लागली त्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.
या घटनेची माहिती मिळाली असता जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सह इतर अधिकारी वर्ग आज सकाळी घटनास्थळी दाखल झाला. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला धीर देत घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.