धुळे जिल्हा
धुळे तालुका पोलिसांनी लावलेल्या सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करणाऱ्या फलकामुळे हैदराबाद येथील व्यापारी लुटमार होण्यापासून बचावले.
धुळे तालुक्यातील अजनाळे चौफुलीवर धुळे पोलिसांच्या वतीने परप्रांतीय नागरिकांना उद्देशून ऑनलाइन विविध प्रकारचे आमिषे दाखवून दुर्गम भागात बोलवून घेत लूटमार करणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहण्यासाठी आवाहन करणारे मोठे फलक लावले आहेत. ह्या फलकामुळे आज हैदराबाद येथील चार जण बचावले. त्यांनी सोशल मीडियावर जुनी करन्सी स्वस्तात देण्याच आम्हीच दाखवणाऱ्या एका रील पाहून धुळे तालुक्यातील अजनाळे परिसरात पोहोचले होते सोबत एक लाख रुपये आणले होते मात्र त्यांनी पोलिसांनी लावलेले बॅनर पाहिले आणि सावध झाले त्वरित धुळे तालुका पोलिसांना संपर्क साधला पोलिसांनी हैदराबादच्या या चारही जणांना होणाऱ्या लुटमारीच्या घटनांची माहिती देऊन सावध केले याविषयी परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक सागर देशमुख यांनी सांगितले की धुळे तालुक्यात तसेच साक्री तालुक्यात काही टोळ्या ऑनलाइन विविध प्रकारचे आमिष दाखवणारे रिल्स व्हिडिओ संदेश तयार करून टाकतात आणि ते बघून परप्रांतीय पैशाच्या लालचेतून या ठिकाणी मोठ्या रक्कम तसेच दागदागिने घेऊन येतात अशा परप्रांतीयांना दुर्गम भागात बोलवून घेत टोळ्या मारहाण करून लुटतात. असे अनेक गुन्हे येथे घडले आहेत. यावर उपाययोजना म्हणून पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनात धुळे तालुका पोलिसांनी महामार्गांवर आणि संबंधित ठिकाणांवर सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करणारे बॅनर लावले आहेत. अजनाळे शिवारात लावलेल्या बॅनर मुळे आज हैदराबाद येथील नागरिक फसवणूक होण्यापासून बचावले आहेत तरी महाराष्ट्रासह इतर राज्यातील नागरिकांनी यातून बोध घ्यावा आणि सोशल मीडियावर विविध प्रकारचे लालच दाखवणारे रिल्स व्हिडिओ बघून अशा टोळ्यांच्या सापळ्यात अडकू नये, असे आवाहन केले आहे.