जागतिक परिचारिका दिन निमित्त आरंभ फाउंडेशनतर्फे विशेष सन्मान

धुळे जिल्हा

जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने आरंभ फाउंडेशनने परिचारीकांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात सत्कार/सन्मान करून त्यांना भेटवस्तू देण्यात आली.

रुग्णसेवेत परिचारीकांचा फार मोठा सहभाग असतो रुग्ण दाखल होण्यापासून तर रुग्ण बरा होऊन घरी जाईपर्यंत परिचारिका आपल्या परिवारा प्रमाणे रुग्णाची काळजी घेतात, तसेच आपल्या समाजातील हा एक अविभाज्य घटक आहे. या घटकामुळे समाजावर आरोग्य विषयी येणार्‍या मोठमोठ्या समस्येवर आपणास मात करता आली आहे. ज्याप्रमाणे सीमेवर जवान आपल्या प्राण्याची बाजी लावतो त्याचप्रमाणे परिचारिका देखील आपल्या प्राणाची बाजी लावून रुग्णाचा प्राण वाचवतो एक प्रकारे परिचारिका हे देखील देशसेवाच करतात याकरिताच त्यांचा सत्कार/सन्मान करणे हे आपलं कर्तव्य आहे म्हणूनच आज जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने आरंभ फाउंडेशनने यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात सत्कार/सन्मान करून त्यांना भेटवस्तू देण्यात आली.

कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी डॉ दत्ता देगावकर, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय धुळे, आरंभ फौंडेशनचे अध्यक्ष सचिन शेवतकर, राहुल याद्निक, संदीप कोडगीर, अति जिल्हा शल्यचिकित्सक, डॉक्टर महेश भडांगे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विवेक जाधव, नितीन गोंधळी यांच्या उपस्थितीत वंदना मोरे, प्रतिभा घोडके, दिपाली मोरे, कमलेश परदेशी, अमरजीत पवार, श्रीकांत तांबे यांच्यासह सर्व परिचारिकांचा सत्कार सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *