भाजपला नेते नव्हे, कार्यकर्ते हवे ! – आ. अनुप अग्रवाल
पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल मासुळे यांच्या नेतृत्वात
200 हुन अधिक जेष्ठ नागरिकांचा भाजपात प्रवेश
प्रत्येक हिंदू घरात असावा भाजपचा कार्यकर्ता..
मंडळअध्यक्ष, आजी-माजी व भावी नगरसेवकांवर टाकली जबाबदारी !!
धुळे शहर
भारतीय जनता पक्षाला आता नेते नव्हे तर सामान्य कार्यकर्ते हवे आहेत. प्रत्येक हिंदू घरात भाजपचा कार्यकर्ता असावा. असे संघटन घडवण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्यासाठी मंडल अध्यक्षांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात येत आहे. मंडळअध्यक्ष, माजी नगरसेवक, भावी नगरसेवक यांनी पक्षप्रवेशासाठी प्रयत्न करावे. प्रत्येक रविवारी असे पक्ष प्रवेश कार्यक्रम घावे, असे आवाहन आमदार अनुप अग्रवाल यांनी धुळ्यातील भाजप पदाधिकाऱ्यांना केले आहे. त्याला तत्काळ प्रतिसाद देत पश्चिम मंडल अध्यक्ष अमोल उर्फ बंटी मासुळे यांनी 200 हुन अधिक जेष्ठ नागरिकांचा आज भाजप प्रवेश घडवून आणले.
धुळे महानगर भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम मंडल अध्यक्षपदी माजी युवा नगरसेवक अमोल मासुळे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. त्यांचा तसेच सर्व मंडल अध्यक्षांचा विशेष सत्कार नुकताच भारतीय जनता पक्षाच्या वतीने तसेच धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. नवनिर्वाचित मंडळाध्यक्ष प्रथमेश गांधी, पंकज धात्रक, ज्ञानेश्वर पाटील, बंटी मासुळे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी आमदार अनुप अग्रवाल यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्या.
आ. अग्रवाल यावेळी म्हणाले की, आपल्याला साधारण माणसांचे पक्षप्रवेश घडवून आणायचे आहेत. दर रविवारी १० ते १२ या वेळेत हे प्रवेश सोहळे होतील. युती होईल, न होईल तो पुढचा प्रश्न आहे. परंतु, आपल्याला स्वबळावर लढायचे आहे, असे समजूनच काम करा, तरच महापालिका आपल्या ताब्यात येईल, असेही आ. अग्रवाल म्हणाले.
भाजपाला नेत्यांची गरज नाही. कारण काही नेत्यांचे सर्व पक्ष फिरुन झाले आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाने कोणालाही फरक पडत नाही. ग्राउंड लेव्हलवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आपल्याला गरज आहे. त्यामुळे तळमळीने काम करणाऱ्या तरुणांना भाजपासोबत जोडा, त्यांचे प्रवेश सोहळे घडवून आणा. त्यांच्यापर्यंत पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमाची माहिती पोहचेल याची काळजी घ्या. मात्र, हे करत असताना जुन्या कार्यकर्त्यांनाही विसरु नका. भाजपात सर्वच कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल. कोणावरच अन्याय केला जाणार नाही. आपल्याला महापालिका ताब्यात घ्यायची आहे, त्यासाठी मंडळअध्यक्षांवर मोठी जबाबदारी सोपवली जाणार आहे.
आमदार अनुप अग्रवाल यांनी केलेल्या आवाहनाला तत्काळ प्रतिसाद देत पश्चिम अध्यक्ष अमोल मासुळे यांनी आज रविवार 4 मे रोजी शेकडो ज्येष्ठ नागरिकांचा भाजपा प्रवेश घडवून आणला आमदार अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला यावेळी माजी महापौर जयश्रीताई अहिराव प्रतिभाताई चौधरी माजी नगरसेवक संतोष खताळ यशवंत येवलेकर तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार अनुप अग्रवाल यांनी सर्व नागरिकांचे पक्षात स्वागत केले भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणि केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत त्या सर्व योजनांचा लाभ धुळ्यातील नागरिकांना मिळवून देत शहराचा विकास आणि नागरिकांना उत्तम सुविधा देण्याचा निर्धारही याप्रसंगी आमदार अग्रवाल यांनी बोलून दाखवला तसेच मंडल अध्यक्ष बंटी मासुळे यांनी केलेल्या कार्याची ही विशेष कौतुक केले.