“फुले” चित्रपट टॅक्स फ्री करा – रणजीत राजे भोसले

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित “फुले” चित्रपट टॅक्स फ्री करावा
रणजीत राजे भोसले यांची मागणी

धुळे जिल्हा

25 एप्रिल 2025 रोजी दिग्दर्शक अनंत महादेवन यांचा “फुले” हा चित्रपट जगभरात प्रसिद्ध झाला असून प्रेक्षकांची मोठी पसंती या चित्रपटाला मिळत आहे. हा चित्रपट अधिकाधिक लोकांना पाहायला मिळावा, म्हणून टॅक्स फ्री करण्यात यावा. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांनी जिल्हाधिकारी व शासनाकडे केली आहे.

दलितांना पाण्याचा औद खुला केला, शिक्षणाचे दार उघड केली, महिला शिक्षणासाठी पाऊल टाकली. इतकाच मर्यादित महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचा इतिहास नाही. तर त्याहून व्यापक काम महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी करून ठेवले आहे. त्यांचा कार्याचा प्रभाव इतका आहे की, जसा 19 शतकात त्यांच्या कार्याला विरोध केला गेला तितकाच विरोध २१ व्या शतकात त्यांच्या चित्रपटाला झाला. परिणामी चित्रपटातील जवळपास 12 सिन्स सेंसर बोर्डाने कापले. परंतु महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंचे विचार तोकडे पडले नाहीत.

माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्यासाठी लढणाऱ्या जोडप्यांचा हा प्रवास प्रत्येकाने पहावा. त्यांच्याविषयी अपप्रचार करणाऱ्या जबाबदार व्यक्तींना सुद्धा हा चित्रपट आवर्जून दाखवावा. त्यामुळे अनेक गैरसमज दूर होतील. या चित्रपटातून आपल्याला समाज उन्नतीसाठी उभारलेल्या चळवळीचा जिवंत इतिहास पाहायला मिळेल. त्यामुळे माझी विनंती आहे की, फुले चित्रपट टॅक्स फ्री करत अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परिवर्तनवादी पुरोगामी महाराष्ट्राच्या घडणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वाचा सन्मान झाला पाहिजे.तरी राज्य सरकारने “फुले” चित्रपटाला टॅक्स फ्री करावा. अशी मागणी त्यांनी राज्य सरकार व जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *