धुळेकरांसाठी रविवारी सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी

धुळेकरांना सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी…
४ मे रविवारी कल्याण भवन येथे कार्यक्रम.

धुळे शहर

आपल्या देशात वेव्हज परिषद चालू आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून धुळे येथे आज दिनांक 4 मे रविवार रोजी कल्याण भवन संतोषी माता चौक या ठिकाणी सायंकाळी ठीक 6:00वाजता. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम शासकीय असून सांस्कृतिक कार्य संचलन यानमार्फत आयोजित करण्यात आला असून वेव्हज 2025. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जागतिक शिखर परिषद मुंबई येथे दिनांक एक ते चार मे 2025 या कालावधीत संपन्न होत आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी श्री जे एस पापळकर साहेब राहणार असून प्रमुख पाहुणे ऍड मधुकरजी भिसे. उपाध्यक्ष धुळे वकील संघ . तसेच प्रवीण जी ईश्वर पवार. भाजपा जिल्हा अध्यक्ष शिरूड विभाग यांसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत..
धुळेकरांना रसिकांना खूप मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थितीत राहावे अशी विनंती करण्यात येत आहे. या कार्यक्रमात सांगली येथील कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहे.
तसेच या कार्यक्रमात A v. तसेच संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा. मनोरंजन क्षेत्रातील भारताचे स्थान. चर्चासत्र तसेच नृत्य महाराष्ट्र गीते लोककलाकारांचे नृत्य. वाद्यांची जुगलबंदी. नाट्यगीत चित्रपट गीत लोकगीत लोकधारा यांसह आदी कार्यक्रमांचा समावेश आहे.

या महत्त्वपूर्ण आणि मनोरंजन अशा गोड आणि सुंदर कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी धुळेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावी हीच विनंती करण्यात येत आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *